
ःहर्णैमध्ये राष्ट्रीय दर्जाचा मत्स्यप्रक्रिया उद्योग
rat१७१९.txt
बातमी क्र..१९ ( पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat१७p३.jpg ः
८३३६२
हर्णै ः हर्णै बंदर
---
हर्णैमध्ये राष्ट्रीय दर्जाचा मत्स्यप्रक्रिया उद्योग
आमदार कदम ; आणखी एका प्रकल्पाचेही सूतोवाच
हर्णै, ता. १७ ः दापोली तालुक्यामध्ये हर्णै ग्रामपंचायत हद्दीमध्ये राष्ट्रीय दर्जाचा मत्स्यप्रक्रिया उद्योग उभा राहणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकल्पाकरिता हर्णै ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या ८४ हेक्टर जमिनीपैकी ७२ हेक्टर जागा वापरण्यात येणार आहे. याची लवकरच परिपूर्ण अशी माहिती देऊ, असे देखील कदम यांनी सांगितले.
दापोलीत हर्णै व दाभोळ ही दोन मोठी बंदरे व मत्स्यविक्री केंद्र तसेच बुरोंडी, कोळथरे, आंजर्ले, केळशी आदी छोटी बंदरेदेखील आहेत. या सर्व ठिकाणी छोट्या-मोठ्या प्रमाणात मत्स्यविक्री माशांची उलाढाल सुरू असते. हर्णै येथे तर करोडो रुपयांची उलाढाल दरवर्षी होते. शिवाय येथील मासे परदेशातदेखील रवाना होतात. यातून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन देशाला उपलब्ध होते व हजारो तरुणांना रोजगार मिळतो. आमदार कदम यांनी पुढाकार घेऊन हर्णै येथे उद्योग विभागाच्या माध्यमातून माशांवर आधारित सुमारे १ हजार हातांना रोजगार निर्मितीचा उद्योग उभा राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या प्रकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाईल व दापोलीचे नाव देशाच्या नकाशावर कायमस्वरूपी पुन्हा एकदा उद्योगक्षेत्रात देखील नोंदवले जाईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प इकोफ्रेंडली असल्यामुळे यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही तसेच स्थानिकांना गावातच रोजगार मिळेल. शिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणखी एक मोठा प्रकल्प दापोलीत येणार असल्याचे सूतोवाच देखील कदम यांनी केले.
दृष्टीक्षेपात...
*ग्रामपंचायतीची ७२ हेक्टर जागा
*सुमारे १ हजार हातांना रोजगार
*अंतिम रूप देण्याचे काम सुरू
*प्रकल्प पूर्णपणे परयावरणस्नेही