महसूलमंत्री, विखे-पाटीलांनी विद्यार्थ्यांची केली आस्थेने चौकशी

महसूलमंत्री, विखे-पाटीलांनी विद्यार्थ्यांची केली आस्थेने चौकशी

Published on

rat१७२१.txt

बातमी क्र.. २१ (पान ३ साठी)
(टीप- अहमदनगर, शेगाव येथेही पाठवावी.)

महसूलमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी

रत्नागिरीतून साधला संवाद ; शेगावमध्ये जेवणानंतर ८४ विद्यार्थ्यांना झाला त्रास

रत्नागिरी, ता. १७ ः शिर्डी येथे उपचार सुरू असलेल्या ८४ विद्यार्थी व ४ शिक्षकांची व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आस्थेने चौकशी केली. रत्नागिरी येथून हा संवाद साधत शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आणि संबंधितांना मुलांची काळजी घेण्याचे आदेश दिले. या वेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकरदेखील उपस्थित होते.
अमरावतीतील आदर्श हायस्कूल दर्यापूर येथून २३० मुले आणि १५ शिक्षक शिर्डीत आले होते. शेगाव, अहमदनगर येथून ते सर्वजण रात्री देवगडकडे जाणार होते. गुरुवारी (ता. १६) दुपारी शेगाव, अहमदनगर येथे त्यांनी स्वतः तयार केलेले जेवण जेवल्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्रास झाल्याने ८४ मुले आणि ४ शिक्षकांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सद्यःस्थितीत रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आज शिक्षक महाअधिवेशनानिमित्ताने रत्नागिरी असलेल्या महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत शिर्डी उपविभागीय अधिकारी आणि साईबाबा संस्थानचे साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच वेळोवेळी याबद्दलची माहिती घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विखे-पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासमवेत असताना थेट अहमदनगर येथे संबंधित अधिकारीवर्गाकडून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती जाणून घेत आस्थेने चौकशी केली. या वेळी उपचाराअंती सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घेऊन मुलांची काळजी घेण्याबाबतचे आदेश संबधितांना त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com