
प्रफुल्ल ठोकरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
83617
आसोली ः येथील शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल ठोकरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
प्रफुल्ल ठोकरे यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
सावंतवाडी, ता. १८ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री देव नारायण विद्यामंदिर आसोली क्रमांक १ शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा झाला. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्यावतीने आसोली शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल ठोकरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हितेश कांबळी याला आदर्श विद्यार्थी तर इंदु गावडे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व राष्ट्रीय छावा संघटना यांच्याकडून सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास संतोष तळवणेकर, कल्याण कदम, श्री. पारधी, आसोली ग्रामपंचायत सरपंच बाळा जाधव, आसोली विकास मंडळ मुंबई अध्यक्ष अशोक धुरी, रुपेश पाटील, विजय धुरी, सुरेश धुरी, प्रकाश परब, कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश पोळजी आदी उपस्थित होते. ईश्वर थडके यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक प्रफुल्ल ठोकरे यांनी आभार मानले.