कुणकेश्वरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणकेश्वरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट
कुणकेश्वरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट

कुणकेश्वरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट

sakal_logo
By

83637
कुणकेश्‍वर ः येथील मंदिरात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदींनी पूजा केली.

83638
कुणकेश्‍वर ः येथील यात्रेत शेतीजन्य साहित्य विक्रीस आले होते.

83639
कुणकेश्‍वर ः येथे हंगामी एसटी स्थानक उभारले होते.

83640
कुणकेश्‍वर ः येथील मंदिरात अतुल रावराणे, संदेश पारकर यांचा सन्मान करण्यात आला.

83641
कुणकेश्‍वर ः येथील मंदिरात भजने सुरू होती. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी, वैभव केळकर)


कुणकेश्वरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट

यात्रेनिमित्त चोख बंदोबस्त; २२ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी तैनात

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. यात्रेत बंदोबस्तासाठी २२ अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षरक दलाचे (होमगार्ड) मिळून सुमारे १६१ कर्मचारी कार्यरत आहेत. समुद्रकिनारी भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील भाविक यात्रेकरूंच्या सोयीसाठी गाड्यांची व्यवस्था केली होती. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. दरम्यान, यात्रा परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली होती.
उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेत बंदोबस्त कार्यरत आहे. एकूण २२ अधिकारी, १०५ पोलिस कर्मचारी तसेच ५६ होमगार्ड तैनात होते. शिवाय भाविक यात्रेकरूंची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राखीव पोलिस दल, बाँब शोध, नाशक पथकही कार्यरत होते. विविध ठिकाणी पोलिस पथके कार्यरत होती. मंदिर परिसरात पंचायत समिती कक्ष कार्यरत आहे. यात्रेसाठी कुणकेश्‍वर येथे पोलिसांचा नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. वरिष्ठांकडून अधूनमधून पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला जात होता. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोक्याच्या जागी पोलिस तैनात होते. इळयेसड्याच्या दिशेने यात्रा स्थळावर एसटी, खासगी चारचाकी वाहने, दुचाकी वाहने पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था आहे. तसेच कातवण, मिठबांव आदी मार्गाकडून येणारी वाहने मंदिरापासून काही अंतर जवळ नेता येत होती. तारामुंबरी मिठमुंबरी पुलावरून कुणकेश्‍वरला येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनेही नियोजन केले होते. त्या ठिकाणीही खासगी वाहनांना पार्किंगची व्यवस्था होती.
......................
चौकट
आरोग्य पथके कार्यरत
यात्रेतील भाविकांना वैद्यकीय सुविधेसाठी दोन आरोग्य पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. यात्रेत मनोरंजन पाळणे तसेच अन्य साहसी खेळ आले आहेत. अन्य दुकानेही थाटण्यात आली आहेत.