एलआयसी एजंट राजापूर शाखाध्यक्षपदी कातकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलआयसी एजंट राजापूर शाखाध्यक्षपदी कातकर
एलआयसी एजंट राजापूर शाखाध्यक्षपदी कातकर

एलआयसी एजंट राजापूर शाखाध्यक्षपदी कातकर

sakal_logo
By

rat१८p८.jpg
८३५९९
राजापूरः नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना रफिक डोसानी.
-----------
एलआयसी एजंट राजापूर
शाखाध्यक्षपदी कातकर
राजापूरः एलआयसी एजंट असोसिएशन शाखा राजापूरची वार्षिक सभा झाली. त्यामध्ये नूतन कार्यकारिणीची निवड केली असून, त्याच्या अध्यक्षपदी अशोक कातकर यांची तर सचिवपदी आनंद कुळकर्णी, खजिनदारपदी चंद्रशेखर मोंडे यांची निवड करण्यात आली. या वेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशीः अध्यक्ष अशोक कातकर, उपाध्यक्ष महेंद्र पांचाळ, सुरेश पटेल, सचिव आनंद कुळकर्णी, सहसचिव सुधीर विचारे, खजिनदार चंद्रशेखर मोंडे, महिला सदस्य पूनम गुजर, सल्लागार रफिक डोसानी, शैलेश आंबेकर, महेश सप्रे, सुभाष नवाळे, विलास दरडे, अमित सरदेसाई.
---------
राजापुरात २२ ला रक्तदान शिबिर
राजापूरः कुणबी तरुण मंडळातर्फे बुधवारी (ता. २२) शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कुणबी समाजाचे नेते (कै.) माळी गुरूजी यांच्या पुणतिथीचे औचित्य साधून सकाळी १० ते २ वा या कालावधीमध्ये होणार्‍या या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहन घुमे, सचिव राजू कार्शिंगकर यांनी केले आहे.
-----
rat१८p७.jpg
८३५९८
साडवलीः देवरूख येथे बंजारा समाजाने काढलेली भव्य मिरवणूक.
-----------
देवरुखात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक
साडवलीः बंजारा समाजसेवा संघ संगमेश्वर तालुक्यातर्फे श्री श्री श्री जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज बंजारा कुलगुरू यांचा २८४वा जयंती उत्सव उत्साहात पार पडला. पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालयात हा सोहळा झाला. सावरकर चौक ते पाटगाव अशी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बंजारा समाजाची ४५० कुटुंबे तालुक्यात आहेत. हे सर्व बांधव मिरवणुकीत सहभागी झाले. पूजाविधी पार पडले. या वेळी माजी सभापती पूजा निकम, सुभाष बने, रोहन बने, सुरेश बने, मृणाल शेट्ये, प्रतीक्षा वणकुद्रे, युयुत्सु आर्ते, ज्योती गोपाळ, सुबोध पेडणेकर यांचा समावेश होता. या सोहळ्याच्या आयोजनात संजय राठोड, किरण पवार, अशोक राठोड, शंकर राठोड व कार्यकर्ते यांचे योगदान लाभले.
--------------------
पाजपंढरी-कणेरी मठ एसटी सेवा सुरू
दाभोळः दापोली तालुक्यातील पाजपंढरी हर्णै ते कणेरी मठ ही बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही बस सुरू करण्याची मागणी एसटीचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्याकडे करण्यात आली होती. ही बस पाजपंढरी येथून सकाळी ९.३० वा. सुटणार असून वाकवली, खेड, चिपळूण पोफळी, पाटण, कराड, कोल्हापूरमार्गे कणेरी मठ येथे सायंकाळी ५.४५ वा. पोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस रात्री ८.३० वा. कणेरी माठ येथून सुटणार आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आव्हान एसटी प्रशासनाने केले आहे.
-----------------