तृणबिंदुकेश्वर मंदिरात शिवशंभोचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृणबिंदुकेश्वर मंदिरात  शिवशंभोचा जागर
तृणबिंदुकेश्वर मंदिरात शिवशंभोचा जागर

तृणबिंदुकेश्वर मंदिरात शिवशंभोचा जागर

sakal_logo
By

rat18p12.jpg
83624
रत्नागिरी : शहरातील तृणबिंदूकेश्वर पहिल्या छायाचित्रात तर दर्शनासाठी लागलेली रिघ दुसऱ्या छायाचित्रात आणि श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ भजन सादर करताना बुवा सुनील मिरजुळकर व सहकारी तिसऱ्या छायाचित्रात. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------
तृणबिंदुकेश्वर मंदिरात
शिवशंभोचा जागर
रत्नागिरी, ता. १८ : ग्रामदैवत श्री भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे आज महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तृणबिंदूकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती. तसेच दिवसभर विविध भजन मंडळांनी शिवशंभोच्या भजनांनी वातावरण भारून टाकले. यानिमित्त मंदिरात आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली. भाविकांना खिचडी, दुध, खजूर असा प्रसाद देण्यात आला.
सकाळी श्रीदेव तृणबिंदुकेश्वरावर लघुरुद्र, नंतर श्री देव भैरीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिवसभर भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ (किरदुवे देवरुख, बुवा अमोल पांचाळ), श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, (तरवळ बुवा संजय माचिवले), श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ (सैतवडे, बुवा सुनिल मिरजुळकर) यांनी भजने सादर केली. सायंकाळी देवरुखचे किर्तनकार दत्तराज वाडदेकर यांनी कीर्तनसेवा केली. त्यानंतर श्री सिद्धीविनायक भजन मंडळ (खालची आळी, शुभदा आगाशे व सहकारी), श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे, बुवा विजय मयेकर), जय भैरव प्रासादिक भजन मंडळ (मुरुगवाडा बुवा अजय पिलणकर) आणि श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार, बुवा सुदेश नागवेकर) यांनी भजनसेवा केली. रात्री भोवत्या होऊन उत्सवाची सांगता झाली. राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर, किल्ला येथील श्री भागेश्वर, श्री शहरात शंकराच्या विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी केली होती.