पावस ः 11 खांबांची, 21 पायली तांदूळाची महापूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस ः 11 खांबांची, 21 पायली तांदूळाची महापूजा
पावस ः 11 खांबांची, 21 पायली तांदूळाची महापूजा

पावस ः 11 खांबांची, 21 पायली तांदूळाची महापूजा

sakal_logo
By

rat१८p१७.jpg
८३६७१
पावसः गावखडी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बांधलेली तांदळाची महापूजा.
rat१८p१८.jpg-
८३६७२
गावखडीतील रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी.
------------
११ खांबांची, २१ पायली तांदूळाची महापूजा
गावखडीतील रामेश्वर मंदिर ; महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
पावस, ता. १८ः रत्नागिरीत गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. यानिमित्ताने बांधलेली तांदूळाची पूजा लक्षवेधी ठरली.
श्रीदेव रामेश्वर उत्सव मंडळाच्यावतीने भाविकांच्या सहकार्यातून भक्तिभावाने मांगल्य, एकोप्याने मोठ्या दिमाखात गावखडी रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. आज महाशिवरात्रीच्या दिवशी ११ खांबांची आणि २१ पायली तांदळाची महापूजा बांधण्यात आली आहे. ही तांदळाने बांधलेली महापूजा हे भक्तिगणांचे आकर्षण असते. आज सकाळपासून हळदीकुंकू, खिचडी प्रसाद, तीर्थप्रसाद भाविकांना रामेश्वर मंदिरात देण्यात आला. शनिवारी (ता. १८) पहाटे ५ वा. लघुरूद्र, शिवपूजा, सकाळी ८ वा. क्रीडास्पर्धा, ९ वा. शिवदर्शन, ९ वा. स्थानिक भजने, १० वा. हळदीकुंकू, दुपारी २.३० वा. पुराणकथन प्रकाश फडके, दुपारी ३.३० वा. कीर्तन, रात्री ८ वा. आरती, भोवत्या, रात्री १०.३० वा. नाट्यप्रयोग ''प्रेम करावं पण जपून'' होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहेत.