लोटेनजीक टँकरखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटेनजीक टँकरखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू
लोटेनजीक टँकरखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

लोटेनजीक टँकरखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

sakal_logo
By

rat१८२६.txt

बातमी क्र..२६ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१८p२०.jpg ः
८३६८२
खेड ः वृद्ध महिलेस धडक दिलेला ट्रक.
( छाया ः ज्ञानेश्वर रोकडे, लोटे )
--------------
लोटेनजीक टँकरखाली सापडून वृद्धेचा मृत्यू

खेड, ता. १८ ः तालुक्यातील लोटेमाळ-माळवाडी येथे टँकरखाली सापडून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीमती सावित्री धोंडू कालेकर (वय ७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक प्रसन्न गजानन पटवर्धन (वय २५, रा. माळवाडी-लोटे) हा दहाचाकी टँकर घेऊन लोटे औद्योगिक वसाहतीमधून कारखान्यामध्ये पाण्याचा टँकर रिकामा करून पुन्हा आपल्या घराकडे अंतर्गत ग्रामपंचायत रस्त्यावरून जात होता. त्याच दरम्यान लोटे कालेकरवाडी येथील वृद्ध महिला श्रीमती सावित्री कालेकर या रस्त्यावरून चालत लोटे माळ स्टॉपच्या दिशेने जात होत्या. त्या वेळी हा अपघात झाला. ही घटना घडल्याचे समजताच तत्काळ लोटे माळवाडी व कालेकरवाडी येथील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी लोटे पोलिस दूरक्षेत्रामध्ये या घटनेची माहिती दिली. लोटे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलिस कॉन्स्टेबल येळकर, पडळकर घटनास्थळी हजर झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला. टँकरचालक प्रसन्न पटवर्धन यांच्यावर अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास लोटे पोलिस करत आहेत.