
चिपळूण ःशिवसेना अन धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचा जल्लोष
ratchl185.jpg ः
83635
शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर महिलांनी पेढा भरवून आनंद व्यक्त केला.
----------------
जिल्ह्यात शिंदे गटाची आतषबाजी
शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हं मिळाल्याचा जल्लोष; पेढे वाटून आनंद व्यक्त
चिपळूण, ता. १८ः केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हं जाहीर होताच त्याचे पडसाद चिपळुणात उमटले. सायंकाळी शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चिंचनाका येथे जमले. फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. पालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करत घोषणा देण्यात आल्या. देवरूख तसेच गुहागर येथेही जल्लोष करण्यात आला.
शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर येथील माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच चव्हाण यांना बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेतेपद मिळाले. दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटात जाणाऱ्यांचा ओघ वाढतच चालला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्हं आणि नाव शिंदे गटाला मिळाल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर येथील शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळीच शहरातील चिंचनाका आणि पालिकेसमोर जल्लोष केला. जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. पालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत घोषणाबाजी केली. यात महिला पदाधिकारीही सहभागी झाल्या होत्या.
या वेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख महंमद फकीर, रश्मी गोखले, सीमा चव्हाण, स्वाती दांडेकर, तेजस्विनी साटम, विकी लवेकर, अंकुश आवले, राकेश देवळेकर, निहार कोवळे, सचिन शेट्ये, विशाल नरळकर, ओंकार नलावडे, आरती महाडीक, राजेश पाताडे आदी उपस्थित होते.
संध्याकाळी देवरूखातही शहरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे एकच जल्लोष करण्यात आला. या वेळी शिवाजीचौक, बसस्थानक, बाजारपेठ, माणिक चौक, मातृमंदिर चौक, कांजिवरा, सह्याद्रिनगर आदी भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी प्रमोद पवार, प्रसाद सावंत, पपू गायकवाड, सचिन मांगले, रूपेश माने, शैलेश जाधव, योगेश शिंदे उपस्थित होते.