दाभोळ ः दापोलीतील राजकीय राड्यात महिलांचे दागिने तुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः दापोलीतील राजकीय राड्यात महिलांचे दागिने तुटले
दाभोळ ः दापोलीतील राजकीय राड्यात महिलांचे दागिने तुटले

दाभोळ ः दापोलीतील राजकीय राड्यात महिलांचे दागिने तुटले

sakal_logo
By

दापोलीतील राड्याप्रकरणी
दोन्ही गटांच्या १७ जणांवर गुन्हा
---
महिलांचे दागिने तुटले; गैरवर्तनाची तक्रार
दाभोळ, ता. १८ ः निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची, याचा निर्णय दिल्यावर लगेचच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दापोली शहरातील शिवसेना शहर शाखेत जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘शाखेतून बाहेर जा’, असे सांगत ही शाखा काल (ता. १७) आपल्या ताब्यात घेतली. या वेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली होती. यानंतर दोन्ही गटांच्या महिला कार्यकर्त्यांनी गैरवर्तनाबाबत दापोली पोलिस ठाण्यात रात्री तक्रार नोंदवली.
याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की त्या व त्यांचे सहकारी काल सायंकाळी पावणेआठला शिवसेना दापोली शहर शाखेत बसले असताना आमदार योगेश कदम यांचे सुमारे ५० ते ६० कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव करून शाखेत आले. त्यातील संशयित सुरेश खानविलकर यांनी गैरवर्तन केले; तर संशयित प्रसाद रेळेकर, बाबू पारकर, सुयोग घाग, नदीम मुकादम, प्रकाश साळवी, मंगेश राजपूरकर, जयराज खोपकर, ओंकार दुर्गावळे, निखिल परब यांनी तक्रारदारांबरोबर असलेल्या महिलेशी गैरवर्तन केले. ओंकार दळवी, प्रतिशे शिर्के, प्रतिशे किर्लेकर, राज गुजर, सिमाज काझी यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. या वेळी झालेल्या झटापटीत तक्रारदार यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याची रिंग, तसेच सहकारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून पडून नुकसान झाले आहे. या तक्रारीनुसार संशयित १५ कार्यकर्त्यांवर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक निनाद कांबळे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्या व त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शाखेतून बाहेर जा, असे सांगितले. त्याचा राग येऊन संशयित मानसी विचारे यांनी तक्रारदार व त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना नखाने गळ्याला ओरखडे ओढले. त्यात महिला तक्रारदार यांचे गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले; तर अन्य महिला सहकाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व अंगावरील टॉप ओढला. त्यांना याबाबत विचारणा केली असता संशयित यश विचारे यांनी गैरवर्तन केले. या तक्रारीनुसार दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विलास पडयाळ अधिक तपास करीत आहेत.