
कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
83703
ध्रुवबाळ डुगल
कुत्रा आडवा आल्याने
दुचाकीस्वाराचा मृत्यू
इन्सुली अपघातात डोक्याला मार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-डोबाचीशेळ येथे कुत्रा आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ध्रुवबाळ तुकाराम डुगल (वय ४४, रा. इन्सुली क्षेत्रफळ) रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात आज सकाळी नऊच्या सुमारास झाला. दरम्यान, त्यांचा गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इन्सुली क्षेत्रफळ येथील ध्रुवबाळ डुगल हे आपल्या ताब्यातील दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने जात होते. इन्सुली-डोबाशेळ येथे आला आले असता दुचाकीच्या आडवा कुत्रा आला आणि अपघात झाला. यात ते रस्त्यावर आदळले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तातडीने त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे हलविले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तेथील उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हते. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते पेंटर म्हणून सावंतवाडी तालुक्यात प्रसिद्ध होते. ते उत्तम प्रतीचे रंगकाम करत असत. त्यांच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.