यशानंतरही संस्थेशी नाळ कायम ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशानंतरही संस्थेशी नाळ कायम ठेवा
यशानंतरही संस्थेशी नाळ कायम ठेवा

यशानंतरही संस्थेशी नाळ कायम ठेवा

sakal_logo
By

kan192.jpg
L83853
कणकवलीः एस. एम. हायस्कूलच्या दहावी बँच निरोप समारंभात सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक.
---------

यशानंतरही संस्थेशी नाळ कायम ठेवा
डी. एम. नलावडेः एस. एम. च्या दहावीतील मुलांचा शुभेच्छा कार्यक्रम
कणकवली, ता. १९ः पुढील जीवनात चांगल्या मित्रांची मैत्री करा आणि स्वतः सुद्धा एक चांगले मित्र बना. प्रत्येक विद्यार्थ्याने नावलौकिक मिळवून या संस्थेशी, संस्थेतील शिक्षकांशी नाळ जोडून ठेवावी. भविष्यात उंच ध्येय ठेवून मार्गक्रमण केले तर तुमच्या सोबतच शाळेच्या लौकिकात भर पडेल. संस्थेची आणि शाळेची नाळ कायम जपून ठेवा, असे प्रतिपादन कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव डी. एम. नलावडे यांनी येथे केले.
येथील कणकवली शिक्षण संस्था कणकवली संचलित एस. एम. हायस्कूल प्रशालेच्या दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. नलावडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्था कार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे, मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. वायंगणकर, उपमुख्याध्यापक पी. व्ही. कांबळे, पर्यवेक्षक जी. एन. बोडके उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीमती वायंगणकर यांनी प्रास्ताविक केले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवावा आणि हे करताना आज लहानपणापासून लागत असलेले मोबाईलचे व्यसन यापासून प्रत्येकाने जाणीवपूर्वक लांब राहावे असा मोलाचा संदेश मुख्याध्यापिका वायंगणकर यांनी दिला.
यानंतर दहावीचे विद्यार्थ्यी श्रावणी पाटकर, वेदांत तारळेकर, मंदार राणे, याशिका कदम, श्रावणी शिखरे, ऋषिकेश पाटील, अक्षय डिचोलकर, सिद्धी कुंभार, नेत्रा कदम, दिव्या लाड, केतकी साळवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयातील आनंददायी आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्यावतीने एस. एस. तावडे, एस.पी. पाटकर, व्ही. आर. घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक पी. व्ही. कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये परीक्षेला सामोरे जाताना आवश्यक बाबींकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.एस. एन. तायशेटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करताना शिस्त व संस्कारांसोबत जगाच्या आकाशात गरुड झेप घ्यावी आणि आपले व शाळेचे लौकिक करावे असा संदेश दिला. सूत्रसंचालन व्ही.आर.घोरपडे यांनी केले तर आभार ए. ए. जगदाळे यांनी मानले.


----
सावंत