चराठा कुलदेवतेचा गुरुवारी वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चराठा कुलदेवतेचा गुरुवारी वर्धापनदिन
चराठा कुलदेवतेचा गुरुवारी वर्धापनदिन

चराठा कुलदेवतेचा गुरुवारी वर्धापनदिन

sakal_logo
By

चराठा कुलदेवतेचा
गुरुवारी वर्धापनदिन
सावंतवाडीः चराठा येथील श्री कुलदेवतेचा वर्धापनदिन सोहळा 23 फेब्रुवारीला आयोजित केला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिरात सकाळी 9 वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता महिलांचा दीपोत्सव तसेच ग्रामस्थांची भजने, राश्री 10 वाजता वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
...............
निवृत्ती वेतन
लाभासाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरीः कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे वय 80 व त्यापेक्षा जास्त झाले असून अद्यापही ज्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ प्राप्त झालेला नाही, त्यांनी जन्मदाखल्याच्या पुराव्यासह जिल्हा कोषागार कार्यालय येथे निवृत्तीवेतन शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी केले आहे.
...............
फळप्रक्रिया प्रशिक्षण
उपक्रमास प्रतिसाद
सावंतवाडीः कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग आणि साहस प्रतिष्ठान यांच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी सावंतवाडी येथे आयोजित फळ व पालेभाज्या प्रक्रिया, साठवण प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणात सहभागी दिव्यांगांकडून प्रात्य़क्षिके घेण्यात आली. यावेळी प्रशिक्षिका विदिशा सावंत, जनशिक्षण संस्थानचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गणेश परब आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन दिव्यांग बांधवांनी
.............