रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

सोबत फोटो आहे.
rat१९p२५.jpg- KOP२३L८३८१६
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानतर्फे अरुअप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक सई खानोलकर हिला देताना रवींद्र सुर्वे. सोबत उपाध्यक्ष राजन जोशी, विश्वस्त मंडळी.

श्रीदेव भैरी देवस्थानतर्फे गुणवंतांचा सत्कार
रत्नागिरी : ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षणमहर्षी (कै.) एन. व्ही. तथा अरुअप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेत (वाणिज्य विभाग) अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची सई खानोलकर (९७.१७ टक्के) हिचा सत्कार केला. व दहावीच्या परीक्षेत पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये ९९.८० टक्के गुण मिळवून प्रथम आलेला फाटक हायस्कूलचा केयूर कुलकर्णीचा सत्कार केला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस देऊन ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र सुर्वे यांनी त्यांना गौरवले. या वेळी या वेळी बारा वाडयातील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ बंधु उपस्थित होते.

ओळी
- rat१९p३२.jpg- श्रद्धा बोडेकरP23L83844

श्रद्धा बोडेकरना आदर्श शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी : मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्रद्धा राजन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. नेहमीच्या जबाबदारीव्यतिरिक्त वेगळे काम करणाऱ्या शिक्षकांना सोसायटीतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
सौ. श्रद्धा बोडेकर या रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक, साहित्य आशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. श्रद्धा बोडेकर यांनी महिलांविषयी विविधांगी लेखन केले आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. १८ फेबुवारीला मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील सभागृहात संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबददल भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
----------
वाघजाईच्या चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

देवरुख ः शिवजयंतीचे औचित्य साधुन वाघजाई क्रीडा मंडळ साडवलीतर्फे येथील मीनाताई ठाकरे विद्यालय समोर असलेल्या क्रीडासंकुलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्वच नामांकित विद्यालयानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सकाळी ठीक दहा वाजता माजी राज्यमंत्री रवींद्र माने, साडवली गावचे सरपंच राजू जाधव, ठाकरे विद्यालयचे मुख्याध्यापक नलावडे सर, भुरवणे सर, काकासाहेब सरफरे विद्यालयाचे शिवगण सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन पार पडले.यावेळी श्री वाघजाई क्रीडामंडळाचे श्रीधन बाळेकुंद्री, सागर नलावडे, मनिष दळवी,श्री सप्रे, अक्षय गवंडी, रोशन पानगले, अजय चव्हाण, श्रेणिक डोंगरे आदी उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेत अव्वल आलेले विध्यार्थी पुढील प्रमाणे -मोठा गट १) प्रज्वल महेश घडशी - प्रथम ( सरफरे विद्यालय )२) शिवम निलेश नलावडे - द्वितीय ( ठाकरे विद्यालय )३) अमेय शैलेश चव्हाण - तृतीय ( देवरुख हायस्कूल )४) राज सागर चव्हाण - उत्तेजनार्थ ( सरफरे विद्यालय )५) राहुल सागर चव्हाण - उत्तेजनार्थ ( सरफरे विद्यालय )यांनी तर लहान गट गटातुन १) ओमकार सखाराम रामाणे - प्रथम ( सरफरे विद्यालय ) २) सोहम संजय रहाटे - द्वितीय ( सरफरे विद्यालय ) ३) गिरीश विनायक पातेरे - तृतीय ( ठाकरे विद्यालय ) ४)ओजल संतोष दामूष्टे - उत्तेजनार्थ ( PS Bane स्कुल ) ५) सार्थक अजित जाधव - उत्तेजनार्थ ( अरुंधती पाध्ये स्कुल )
------------------------

नागपुर-मडगाव रेल्वे धावणार १ जुलै पर्यंत
रत्नागिरी - नागपुर ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला १ मार्च २०२३ ते ८ जुन २०२३ आणि १० जुन २०२३ ते १ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खान्देश, विदर्भला जोडणारी गाडी कोकणाला जोडणारी आहे.
खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती होळी, गुढीपाडवा पार्श्वभूमीवर आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी नागपुर ते मडगाव (गोवा) अशी चालवण्यास सुरवात झाली. त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर येथून दर बुधवारी व शनिवारी दुपारी ३.०५ वाजता सुटून गुरुवारी, रविवारी मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४६ वाजता पोहोचेल. मडगाव ते नागपुर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवारी, रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ८.०१ मिनीटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर येथे पोहोचेल. नागपुर ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जं, अकोला जं, शेगांव, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

---------

नेवरे येथे श्री अक्कलकोट स्वामी प्रतिष्ठापना
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे-धामणसे येथील श्री अक्कलकोटी स्वामी सेवा केंद्राच्या श्री गोमाता व श्री अक्कलकोट स्वामी मंदिर (नेवरेफाटा) येथे श्री गणेश, श्री देवी लक्ष्मी, श्री दत्त महाराज, श्री अक्कलकोट स्वामी या देवतेंच्या मूर्तींचा प्रतिष्ठापना सोहळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २७ ला सकाळी ७ वाजता अजित शेटे यांचे घर ते श्री गोमाता मंदिर (नेवरे फाटा) पर्यंत मूर्तींची मिरवणूक, १०१ कलशधारक सुहासिनींसह काढण्यात येणार आहे. त्यानंतर शांतीसुक्त पठणे, संकल्प, गणपती पूजन, मातृका पूजन, नांदीश्राध्द, आचार्यवरण, मुख्यदेवता स्थापना पूजन, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, होम, भगवंत जलाधिवास, पुष्पाधिवास, फलाधिवास, तसेच ३५ दांम्पत्यांसह पुजाविधी होणार आहेत. २८ ला सकाळी ८ वाजता मुख्यदेवता पूजन, पर्याय होम, धान्यनिवास, शय्यानिवास व ३५ दांम्प्त्यांसह पूजाविधी आयोजित केले आहेत. ९ मार्चला सकाळी ८ वाजता मुख्यदेवता पूजन, स्थापित देवता होम, बलिदान पूर्णाहुती व ३५ दांम्पत्यांसह पुजाविधी होणार आहेत. सर्व अनुष्ठान वेदमूर्ती दिनेश कुलकर्णी व त्यांचे सहकारी (जि.संभाजीनगर-मराठवाडा) यांच्या हस्ते होणार आहेत. २ मार्चला सकाळी ८ वाजता नैमित्तिक पूजा, रूद्राभिषेक, आरती, महाप्रसाद, हळदीकुंकू, व त्यानंतर कोतवडे येथील विजयबुवा मयेकर यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री कोतवडे येथील स्वयंभू श्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडळ नमन सादर करणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.