रत्नागिरी- रत्नागिरीत 23 पासून वेदशाळा

रत्नागिरी- रत्नागिरीत 23 पासून वेदशाळा

Published on

पान २ साठी

रत्नागिरीत २३ पासून
पाठशाळेत धार्मिक कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १९ ः वे. मू. वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी (कै.) विनायक आठल्ये गुरूजी व व्याकरणाचार्य (कै.) पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे-२३ ते २७ फेब्रुवारीला दररोज सकाळी ७.३० ते १२.३० या वेळेत ऋग्वेद संहिता पारायण वे. मु. दत्तात्रेय मुरवणे गुरूजी करतील. २३ व २४ ला सायं. ५ ते ७.३० या वेळेत हभप निशिकांत टेंगशे (गोवा) कीर्तनसेवा करणार आहेत. २५ ते २७ दररोज वेदशाळेमध्ये सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत ब्रह्मवर्चसकाम श्रौतयज्ञाचे (ब्रह्मणस्पति इष्टि, पवित्रेष्टि, मित्रविंदेष्टि) आयोजन केले आहे. वे. मु. गणेश जोगळेकर गुरूजी (गोकर्ण, महाबळेश्वर) हे पौरोहित्य करतील. २६ व २७ ला दररोज सायं. ४ ते ६ व ६.३० ते ८ या वेळेत वे. मु. सचिन भाटवडेकर गुरूजी (कडावल) हे रामकथा (बालकांड, भरतचरित्र, हनुमान चरित्र) या विषयावर निरूपण करतील. २७ला सायं. ७ वा. संस्कृत पाठशाळेत वे. मु. घनपाठी दिनकरगुरू माधव फडके (पुणे) यांचा सत्कार समारंभ आयोजित केला.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व माजी विद्यार्थी व वे. मु. वैदिक मार्तंड व वैदिकशिरोमणी (कै.) विनायक सी. आठल्ये गुरूजी व व्याकरणाचार्य (कै.) पु. ना. फडकेशास्त्री स्मृती समितीने केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी संपर्क करून सर्वतोपरी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रम समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कुवळेकर, सचिन आठल्ये यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com