
रत्नागिरी- कोणतेही काम आनंद घेत करावे
rat19p17.jpg- KOP23L83775 गोळवली : राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख संचालिका शांताक्का.
कोणतेही काम आनंद घेत करावे
शांताक्का; राष्ट्रसेविका समितीचे एकत्रिकरण
रत्नागिरी, ता.२१: धर्मरक्षण, संस्कृती रक्षण याचा विचार सतत मनात ठेवून काम करत राहा. सर्व सेविकानी आनंद घेत हे समिती कार्य पुढे न्यावे, असे आवाहन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले.
गोळवली येथील ग्रामविकास प्रकल्पात राष्ट्र सेविका समितिच्या एकत्रीकरणात कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शांताक्का म्हणाल्या की, रामदास स्वामी हे राष्ट्राचा विचार करणारे संत, अध्यात्म साधनेबरोबर समाजाचा विचार त्यांनी केला. पू. गोळवलकर गुरूजींच्या या भूमीत आणि दासनवमी दिवशी हा कार्यक्रम होत आहे, हा अतिशय सुंदर योग आहे.’
दापोली येथील सेविकानी पताका योग, रत्नागिरीतील सेविकांनी संचलन गीत प्रात्यक्षिक केले. जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मृणाल गोंधळेकर यांनी गीत सादर केले. सांघिक गीत श्रुती ताम्हणकर यांनी शिकवले. चिन्मयी लेलेने प्रार्थना सांगितली. रसिका फणसे व अंजली पांचाळ यांनी शिक्षिका म्हणून काम केले. वनिता देशपांडे, नेहा जोशी, सरिता सोलकर यांनी व्यवस्थापन केले.
देवरुखजवळच्या सायले गावातील जि. प. शाळेत शांताक्का यांनी मार्गदर्शन केले. सायलेमधील समितीच्या विस्तारिका पल्लवी शिंदे यांचे कौतुक केले. सायले शाखेतील तरूणी संपर्क प्रमुख मयूरी शिंदे, सुनंदा जेरे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.