संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा आमसभेत

दाभोळ : दापोली तालुक्यात ग्रामीण भागात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. त्यात पुन्हा उसगांव येथील केशव वैद्य यांनी नुकत्याच झालेल्या आमसभेत या वन्यप्राण्याच्या त्रासाबाबत पुन्हा एकदा तक्रार केली आहे.
दापोलीत आमदार योगेश कदम याच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत उसगाव येथील केशव वैद्य यांनी तक्रारपर निवेदन दिले आहे. आणि तातडीने व योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. ग्रामीण भागात वानरे, डुकरे, माकडं, रानगवा आदी प्राण्यांमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. याबाबत वारंवार शेतकरीवर्ग तक्रारी करत आहेत. वाढत्या तक्रारी पहाता या गोष्टींचे गांर्भिय लक्षात घेत लोकप्रतिनिधी असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीने नुकतीच पाहणी व शेतकऱ्याशी चर्चा केली. मात्र या वन्यप्राण्यांचा कसा बंदोबस्त होणार या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमसभेत वैद्य यांनी तक्रार केल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दापोली- बुरोंडी मार्गावरील
खड्डे न भरल्यास उपोषण
दाभोळ ः दापोली ते बुरोंडी या मार्गावरील खड्डे १५ दिवसात न भरल्यास उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन धनाजी मर्चंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.दापोली ते बुरोंडी रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून वारंवार अपघात होत असून वाहनांचेहि नुकसान होत आहे. हे खड्डे भरण्यासाठी मर्चंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी आता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून १५ दिवसात रस्त्यातील खड्डे न भरल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

गळती काढण्यासाठीचा
खड्डा महिनाभर तसाच
दाभोळ : दापोली नगरपंचायतीची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जोडणीला गळती लागल्याने दापोली बसस्थानकासमोरील रिक्षा स्टँन्डच्या मागील दुकानांसमोर गळती काढण्यासाठी खड्डा मारून ठेवण्यात आला आहे. मात्र महिना उलटून गेला तरी तो बुजविण्यात आलेला नाही त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.दापोली बसस्थानकाच्या समोर रिक्षा स्टँन्डच्या मागील बाजूस दुकानांसमोर नगरपंचायतीची पाणी पुरवठा करणारी पाईलाईनची जोडणी फुटली आहे. सदर जोडणी दुरूस्त करण्याकरीता तेथील दुकानांसमोर खड्डा खोदून ठेवण्यात आला. मात्र महिना उलटून गेला तरी हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही. दानपंकडून पाणी सोडल्यानंतर हा खड्डा पाण्याने भरून वाहत असतो. यामुळे पाणी वाया जाते. तसेच तेथील दुकानदारांना तसेच तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठीदेखील तो धोकादायक झाला आहे. याबाबत दापोली नगरपंचायतीकडे संपर्क साधला असता हा खड्डा बुजविण्यात येईल असे सांगण्यात आले.

विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर
दाभोळ : दापोली शिक्षण संस्थेच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी दापोली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर्स आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स यांनी सहकार्य केले. यावेळी उपस्थित डॉक्टर्सच्या वतीने डॉ. मानसी जतकर यांनी विद्यार्थिनींना योग्य आहार, व्यायाम इ. चे महत्व सांगून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. रुबिना धामणकर, डॉ. पल्लवी चव्हाण, डॉ. शबनम मुकादम, डॉ. वैशाली वैशंपायन या डॉक्टर्स उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. प्रियांका साळवी यांनी केले. यानंतर वर्गवार विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.