
शिवरायांचा हजारो वर्षानंतरही अभ्यास होईल
swt1935.jpg
L83936
वैभववाडीः शिवप्रतिमेला पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी पुष्पहार अर्पण केला.
शिवरायांचा हजारो वर्षानंतरही अभ्यास होईल
अमित यादवः खांबाळेत रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ः युध्दनितीतच नव्हे तर सर्वच बाबतीत शिवरायांचे धोरण सरस होते. त्यामुळे साडेचारशे वर्षानंतर देखील त्यांना प्रत्येकाच्या ह्दयात स्थान आहे. देश, परदेशातील लाखो विद्यार्थी त्यांचा अभ्यास करीत आहेत. पुढील हजारो वर्ष देखील शिवरायांचा अभ्यास केला जाईल, असे मत येथील पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी येथे केले.
शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ आणि सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन श्री. यादव यांनी केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सिनेदिग्दर्शक दिपक कदम, कॅप्टन राजाराम वळंजु, सरपंच गौरी पवार, लोरे सरपंच विलास नावळे, कोळपे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच गणेश पवार, गुरूनाथ गुरव, प्रवीण गायकवाड, मंगेश कदम, दिपक चव्हाण, प्रमोद लोके, बंडु गुरव आदी उपस्थित होते.
श्री. यादव म्हणाले, ‘‘साडेचारशे वर्षानंतर आपण शिवरायांचे स्मरण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण शिवप्रेमी करीत राहतील. जगभरातील अनेक इतिहासकार शिवरायांचा अभ्यास अनेक वर्ष करीत आहेत. देश, परदेशातील लाखो विद्यार्थी छत्रपतीच्या एखाद्या धोरणावर आधारीत पीएचडी करीत आहेत. युध्दनितीची चर्चा जगभरात झालेली आहे. परंतु, कष्टकरी, शेतकरी, शोषीतांविषयी त्यांचे धोरण आजही दिशादर्शक ठरत आहे. सागरी सुरक्षितेविषयी त्या काळात त्यांनी ठोस पावले उचलली होती. कोट्यावधी लोक आजही शिवरायांचा अभ्यास करताना दिसत आहेत. छत्रपती ही महाराष्ट आणि देशांची ओळख आहे.’’ रक्तदान शिबीरात २० तरूणांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना शिवप्रतिमा शिवप्रेमीमंडळांकडुन भेट दिली.