Thur, March 30, 2023

वेशभूषा स्पर्धेमध्ये निधी नाईकचे यश
वेशभूषा स्पर्धेमध्ये निधी नाईकचे यश
Published on : 19 February 2023, 3:40 am
वेशभूषा स्पर्धेमध्ये निधी नाईकचे यश
दोडामार्ग, ता. 19 ः चार राज्यांतील स्पर्धकांचा सहभाग असलेल्या शिवसंस्कार वेशभूषा स्पर्धेत दोडामार्ग-सावंतवाडा येथील निधी नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकावला. शिवसंस्कार वेशभूषा स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात येथून या स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन मातृभूमी शिक्षण संस्था, सावंतवाडी आणि शिवसंस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. निधी हिने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून वक्तृत्व सादर केले होते. तिला वडील सागर नाईक, आई सेजल यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
.................