
आरपीडीच्या विद्यार्थ्यांचे एमकेसीएल परीक्षेत यश
swt207.jpg
84029
योगेश जोशी, ओजस मेस्त्री
आरपीडीच्या विद्यार्थ्यांचे
एमकेसीएल परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२२ मध्ये आरपीडी प्रशालेचा योगेश जोशी याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर आठवीचा विद्यार्थी ओजस मेस्त्री याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.
सावंतवाडीतील सरकारमान्य एमएससीआयटी केंद्र आनंदी कॉम्प्युटर्स यांच्यावतीने हे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, पर्यवेक्षक ए. व्ही. साळगावकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, आनंदी कॉम्प्युटर्सचे संचालक मेघःश्याम काजरेकर यांनी अभिनंदन केले.