आचऱ्यात हळदीकुंकू कार्यक्रमास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचऱ्यात हळदीकुंकू कार्यक्रमास प्रतिसाद
आचऱ्यात हळदीकुंकू कार्यक्रमास प्रतिसाद

आचऱ्यात हळदीकुंकू कार्यक्रमास प्रतिसाद

sakal_logo
By

swt२०१०.jpg
८४०३४
आचराः येथे शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला.

आचऱ्यात हळदीकुंकू कार्यक्रम
आचरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून येथे काल (ता. १९) शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवरायांना घडवणाऱ्या माता जिजाबाईंचे विचार कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यानंद परब यांनी मांडले. महिला एकत्र येऊन त्यांच्यामधील एकोपा वाढण्यासाठी गेली चार वर्षे आचरे विभागात हळदीकुंकू समारंभ घेण्याच्या आमदार नाईक यांच्या संकल्पनेमुळे महिलांनी आभार मानले. कार्यक्रमास महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर, वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, महिला युवती पदाधिकारी आर्या गावकर, भारती परब, मिताली कोरगावकर, आशा हजारे, सरिता हिर्लेकर, मनाली आर्लेकर, सुवर्णलता पांगे, सुनीता गावकर, गीता गावकर, विभाग प्रमुख समीर लब्दे, विद्यानंद परब, राजू नार्वेकर, प्रशांत गावकर आदी उपस्थित होते.
.............
आडवलीत मार्चमध्ये स्वामी समर्थ उत्सव
मालवण : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, समर्थगड-आडवली येथे २३ ते ३० मार्च या कालावधीत श्री स्वामी जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २४ मार्चला रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम तीन क्रमांकाना ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रत्येकी सन्मानचिन्ह, उतेजनार्थ क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार आहे. २७ ला रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना १५ हजार, १२ हजार, ९ हजार रुपये पारितोषिक, प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी सीताराम सकपाळ, प्रकाश गवस, अतुल घाडीगावकर, समीर घाडीगावकर येथे संपर्क साधावा.