चिपळूण ः मोदी,शहांना जनता त्यांची जागा दाखवून देईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः मोदी,शहांना जनता त्यांची जागा दाखवून देईल
चिपळूण ः मोदी,शहांना जनता त्यांची जागा दाखवून देईल

चिपळूण ः मोदी,शहांना जनता त्यांची जागा दाखवून देईल

sakal_logo
By

फोटो ओळी
-ratchl२०५.jpg ःKOP२३L८४०९० चिपळूण ः जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना व शिरळ-वैजी रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना जिल्हाप्रमुख सचिन कदम.
----------------
जनता मोदी, शहांना
त्यांची जागा दाखवेल
सचिन कदम ; शिरळ नळपाणी योजना, रस्त्याचे भूमिपूजन
चिपळूण, ता. २० ः सध्या देशामध्ये सत्तेचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत ते नक्कीच येथील लोकशाही व वैचारिकतेला धरून नाही. आज जरी त्यांनी कितीही लोकशाहीविरोधी कामे केली तरी एक दिवस त्यांना जनता दरबारात जावेच लागेल, त्या वेळी जनता नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी लगावला.
चिपळूण तालुक्यातील शिरळ येथे जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना व शिरळ-वैजी रस्ता भूमिपूजन कार्यक्रम रविवारी पार पडला. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मोदी व शहा यांच्यावर तोफ डागली. या वेळी तालुकाप्रमुख संदीप सावंत, मिनल काणेकर, पांडुरंग माळी, सरपंच शशिकांत राऊत, उपसरपंच फैयाज शिरळकर, अशोक नलावडे आदी उपस्थित होते.
सचिन कदम म्हणाले, ‘बळाचा वापर करून आमची अस्मिता असलेला शिवसेना पक्ष, आमचे धनुष्यबाण चिन्ह हे आमच्यापासून हिरावून घेतले असले तरी शिवसेना आमच्या हृदयात आहे. ती कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही’, असे सांगतानाच त्यांनी येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतून प्रत्येक शिवसैनिकांनी आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणा आणि शिवसैनिकांची ताकद दाखवून द्या, असा कानमंत्रही उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही मनोगत व्यक्त करताना शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह गेल्याचे फार मोठे दुःख झाल्याचे बोलून दाखवले. नळपाणी योजनेचे काम दर्जेदार करा, अशी सूचना केली. या वेळी संदीप चिले, शशिकांत साळवी, नितीन निकम, हेमंत मोरे, संदीप जाबरे, रूपेश शेलार, प्रवीण जाधव, ललेश कदम, सुनील मोरे, ग्रामसेवक प्रतापसिंह नाईक, बशीर बेबल, रामचंद्र कदम, माधवी कुळे, हसन खान, साहिल शिर्के आदी उपस्थित होते.