मला पैसे नको, साथ हवी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मला पैसे नको, साथ हवी!
मला पैसे नको, साथ हवी!

मला पैसे नको, साथ हवी!

sakal_logo
By

swt2030.jpg
84145
सावंतवाडीः हर्षदा वाडेकरला व्हीलचेअर प्रदान करताना ‘सामाजिक बांधिलकी’चे सदस्य.

मला पैसे नको, साथ हवी !
दिव्यांग युवतीची हाकः कुटुंबाला सावरण्यासाठी नोकरी हवी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः ‘मला आर्थिक मदत नको, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हात द्या. मला माझ्या कुटुंबाची परिस्थिती सावरायची असून त्यासाठी नोकरी करायची आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे, अशी आर्त हाक ‘त्या’ दिव्यांग युवतीने दिली आणि तिला आधार देण्यासाठी गेलेल्या ‘सामाजिक बांधिलकी’च्या सदस्यांच्या डोळ्यात पाणी तरारले.
शहरातील भटवाडी परिसरात राहणाऱ्या वाडेकर कुटुंबाची व्यथा ऐकून सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते भावूक झाले. अठरा वर्षांपूर्वी पती गेला. सहा वर्षांपूर्वी मुलगा अपघातात गेला, तर वयाच्या सहाव्या वर्षी मुलीला ताप येऊन अचानक अपंगत्व आले. त्यातच तिचे चालणे हळूहळू बंद झाले. असा दुःखाचा डोंगर घेऊन जगणारी माय आणि तिच्या लेकीला ''सामाजिक बांधिलकी''ने आधार दिला. ही मुलगी जास्त काळ जगू शकत नाही, तिला चांगले खायला द्या, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वाक्य ''तिच्या'' डोक्यात अजूनही घर करून राहिले आहे. ती मुलगी, म्हणजेच हर्षदा वसंत वाडेकर ही २१ वर्षांची असून एक ना एक दिवस नक्कीच चालू शकेन आणि आईचा आधारवड बनेन, हा आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर ती बी. कॉमच्या तृतीय वर्षापर्यंत येऊन पोहोचली आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्यावर योग्य उपचार होऊ  कले नाहीत. तरीही भटवाडी परिसरातील नागरिकांनी त्यांना आर्थिक हातभार दिला. गेली कित्येक वर्षे वाडेकर कुटुंब भटवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये राहत आहे.
‘सामाजिक बांधिलकी’चे सदस्य शेखर सुभेदार यांनी या घटनेची माहिती देताच ‘सामाजिक बांधिलकी’ची टीम त्या ठिकाणी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
सेवानिवृत्त प्रा. सतीश बागवे यांनी हर्षदाला सामाजिक बांधिलकीतून योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करूच, परंतु शिक्षणासाठी मदत, संगणक प्रशिक्षणासाठी ॲडमिशन घेऊन देऊ, असे सांगून तिचा आत्मविश्वास वाढविला. यावेळी समीरा खलील यांनी त्या दोघींनाही धीर देत आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू, असे सांगितले. यावेळी हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या विश्वस्त रेखा देसाई, सुजाता गोरे यांनी संस्थेमार्फत हर्षदाला व्हीलचेअर प्रदान केली. तर अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, समीरा खलील, शेखर सुभेदार, साधले, प्रा. बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, शाम हळदणकर, शेखर सुभेदार, शरद पेडणेकर यांनी तिला स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली.