छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करुया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करुया
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करुया

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करुया

sakal_logo
By

छत्रपती शिवाजी महाराजांचे
विचार आत्मसात करुया
चंद्रकांत डामरे ः असलदे येथे शिवजयंती उत्साहात
कणकवली, ता. २०ः छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया, असे प्रतिपादन असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केले.
असलदे गावठणवाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपसरपंच सचिन परब, भगवान लोके, प्रमोद लोके, बाबाजी शिंदे, सावित्री पाताडे, संजय गोरुले, तात्या निकम, आबू मेस्त्री, माजी सरपंच लक्ष्मण लोके, संजय डगरे, जयराम डामरे, सुरेश मेस्त्री, उदय परब, विजय डामरे, पत्रकार उत्तम सावंत, मिलींद तांबे, दिपक तांबे, दयानंद लोके उपस्थित होते.
भगवान लोके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोककल्याणकारी कारभार करत संपुर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेवून रयचेचा राजा कसा असावा? हे आपण अनुभव आहोत. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्वसमावेशक धोरण राबवून राज्य केल्यानेच आजही त्यांचा कार्याचे संपुर्ण जगात स्मरण केले जात आहे. या मंडळाने गेली १३ वर्षे सातत्यपूर्वक ही शिवजयंती साजरी करण्याचा कार्यक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे.
प्रमोद लोके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे वारसदार आपण सर्वजन आहोत. या मंडळाचे कार्यकर्ते शिवजयंती आणि दहीहंडी उत्सव सातत्याने साजरा करत आहेत. शिवजयंतीचा जल्लोष पाहून राजाचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शामराव परब, अध्यक्ष समीर परब, उपाध्यक्ष तुषार घाडी, खजिनदार सत्यवान घाडी, अनंत शिंदे, शामराव परब, महादेव परब, निलेश शिंदे, अनिल परब, मंगेश चव्हाण, आत्माराम घाडी, तातोबा घाडी, विशाल परब, मधुसुदन परब, विश्वनाथ परब, सुरेश परब, ज्ञानेश्वर घाडी यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.