
''दर्पण''कार बाळशास्त्रींना पोंभुर्ले येथे अभिवादन
swt२०४०.jpg
८४२०८
पोंभुर्लेः ''दर्पण''कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना सुधाकर जांभेकर, अमर शेंडे, संतोष कुळकर्णी, अयोध्याप्रसाद गावकर, सचिन लळीत, प्रशांत वाडेकर, अनिल राणे, महेश तेली, रोहित वाकडे, विपुल गुरव आदी.
''दर्पण''कार बाळशास्त्रींना
पोंभुर्ले येथे अभिवादन
तळेरे : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ''दर्पण''कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना २११ व्या जयंतीनिमित्त पोंभुर्ले येथील ''दर्पण'' सभागृहात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व देवगड तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे, देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष कुळकर्णी, अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळीत, कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर, अनिल राणे, महेश तेली, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे रोहित वाकडे, विपुल गुरव आदी उपस्थिते होते.
...............
swt२०४१.jpg
84209
कणकवली ः येथे सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली.
सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे
जानवलीत शिवजयंती
तळेरे : जानवली आदर्शनगर येथे सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्ष अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी सहकारी महिलांसह शिवजयंती साजरी केली. यावेळी डॉ. नीता रावण, वैशाली नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. कांबळी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक महिलेने जिजाऊचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना संस्कार द्यावेत. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी अनेक गमिनीकावे केले; पण ते फक्त स्वराज्यासाठीच केले, असे त्या म्हणाल्या. डॉ. रावण, नाईक, मिलन पाटील, श्रद्धा पाटील, मयुरा भांडारे, अमिता राणे, जान्हवी रावण, अर्चना राणे, स्वरा नाईक, तनिष्का गुरव, संध्या गोंधळकर आदी उपस्थित होत्या.
...