आरोसमध्ये रंगला ''शिवविचार'' सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोसमध्ये रंगला ''शिवविचार'' सोहळा
आरोसमध्ये रंगला ''शिवविचार'' सोहळा

आरोसमध्ये रंगला ''शिवविचार'' सोहळा

sakal_logo
By

आरोसमध्ये रंगला ‘शिवविचार’ सोहळा
शिवजयंतीचे निमित्तः विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः शिवजयंतीच्या निमित्ताने विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे आरोस परिवर्तन युवक मंडळ, विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने ‘शिवविचार सोहळा’ कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. आरोस केंद्रातील शाळा मर्यादित स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनावळे, तर प्रमुख म्हणून मनसेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख महेश परब, शालेय समिती अध्यक्ष गजानन परब, परीक्षक दीपक पटेकर, प्रा. मिलिंद कासार, सामाजिक कार्यकर्ते पवार, आरोस परिवर्तन युवक मंडळाचे निखिल नाईक, प्रवीण मांजरेकर, तन्वी परब, मुख्याध्यापक धुपकर, देऊलकर, सावंत, श्रीमती गोडकर, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक धुपकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागतपर भाषणातून कार्यक्रमाचा उद्देश व शिवविचार मांडले. प्रमुख पाहुणे महेश परब व शालेय समिती अध्यक्ष परब यांनी विचार मांडले.
स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. पहिला गट (पहिली ते चौथी), दुसरा गट (पाचवी ते सातवी) व तिसरा गट (आठवी ते दहावी) अशी विभागणी केली होती. पहिल्या गटासाठी ''छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व स्वराज्याची स्थापना'', दुसऱ्या गटासाठी ''छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती व सैन्य व्यवस्था'', तर तिसऱ्या गटासाठी ''छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार व प्रशासन'' हे विषय देण्यात आले होते.
सावंतवाडीच्या अस्मी मांजरेकर हिने शिवविचार व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडी येथील लेखक कवी दीपक पटेकर, आरपीडी ज्युनिअर कॉलेजचे प्रा. कासार यांनी केले. निखिल नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षक देऊलकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आरोस परिवर्तन युवक मंडळाने केले.

चौकट
स्पर्धेचा निकाल असाः
वेशभूषा स्पर्धाः पहिली ते चौथी-सान्वी मोरजकर, वीरा परब, वैदेही कामत. पाचवी ते सातवी- पूर्वा परब, तन्वी परब, आर्या नाईक. आठवी ते दहावी- दत्ताराम मोरजकर, श्वेता मडुरकर.
वक्तृत्व स्पर्धा ः पहिली ते चौथी- वीरा परब, प्रणय गवस, पूर्वी कळंगुटकर. पाचवी ते सातवी-तनुष्का मेस्त्री, अश्मी पिंगुळकर, निधी भट. आठवी ते दहावी-श्वेता मडुरकर, जान्हवी शिरोडकर.