राऊळ महाविद्यालयाच्या शिक्षकेतरांचा बेमुदत संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊळ महाविद्यालयाच्या शिक्षकेतरांचा बेमुदत संप
राऊळ महाविद्यालयाच्या शिक्षकेतरांचा बेमुदत संप

राऊळ महाविद्यालयाच्या शिक्षकेतरांचा बेमुदत संप

sakal_logo
By

swt२१५.jpg
८४२८०
कुडाळः बेमुदत संपामध्ये सहभागी असलेले राऊळ महाराज महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी.

राऊळ महाविद्यालयाच्या
शिक्षकेतरांचा बेमुदत संप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः संत राऊळ महाराज महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केलेली आहे. हा संप शासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यांच्या संपातील प्रमुख मागण्यांमध्ये सेवांतर्गत सुधारीत आश्वासित प्रगती योजनेला शासनाने रद्द केलेला आहे. तर या प्रगती योजनेला शासनाने पुनर्जीवित करावे. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २०, ३० वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करावी. सातवा वेतन आयोग आदेशानुसार वंचित असलेल्या १४१० विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी सातव्या वेतनानुसार द्यावी. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असली पदे तत्काळ भरण्यासाठी मान्यता द्यावी. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहित धरून त्याआधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी, आदी मागण्यांसाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. यात सर्व अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.