संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो ओळी
-rat२१p२४.jpg KOP२३L८४३१० ः राजापूर ः नूतन पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना रफिक डोसानी.
-----------
एलआयसी एजंट असोसिएशनच्या
शाखाध्यक्षपदी अशोक कातकर
राजापूर ः एलआयसी एजंट असोसिएशन शाखा राजापूरची वार्षिक सभा झाली. त्यामध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, त्याच्या अध्यक्षपदी अशोक कातकर यांची तर सचिवपदी आनंद कुळकर्णी, खजिनदारपदी चंद्रशेखर मोंडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष अशोक कातकर, उपाध्यक्ष महेंद्र पांचाळ, सुरेश पटेल, सचिव आनंद कुळकर्णी, सहसचिव सुधीर विचारे, खजिनदार चंद्रशेखर मोंडे, महिला सदस्य पूनम गुजर, सल्लागार रफिक डोसानी, शैलेश आंबेकर, महेश सप्रे, सुभाष नवाळे, विलास दरडे, अमित सरदेसाई.
---------
फोटो ओळी
-rat२१p२५.jpg ःKOP२३L८४३११ साडवली ः देवरूख येथे बंजारा समाजाने काढलेली मिरवणूक.
----------
देवरुखात संत सेवालाल महाराजांची जयंती
साडवली ः बंजारा समाजसेवा संघ संगमेश्वर तालुक्यातर्फे श्री श्री श्री जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज बंजारा कुलगुरू यांचा २८४वा जयंती उत्सव उत्साहात पार पडला. पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालयात हा सोहळा झाला. सावरकर चौक ते पाटगाव अशी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बंजारा समाजाची ४५० कुटुंबे तालुक्यात आहेत. हे सर्व बांधव मिरवणुकीत सहभागी झाले. माजी सभापती पूजा निकम, सुभाष बने, रोहन बने, सुरेश बने, मृणाल शेट्ये, प्रतीक्षा वणकुद्रे, युयुत्सु आर्ते, ज्योती गोपाळ, सुबोध पेडणेकर यांचा समावेश होता. आयोजनात संजय राठोड, किरण पवार, अशोक राठोड, शंकर राठोड यांचे योगदान लाभले.


पाजपंढरी-कणेरी मठ एसटी सेवा सुरू
दाभोळ ः दापोली तालुक्यातील पाजपंढरी हर्णै ते कणेरी मठ ही बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही बस सुरू करण्याची मागणी एसटीचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्याकडे करण्यात आली होती. ही बस पाजपंढरी येथून सकाळी ९.३० वा. सुटणार असून वाकवली, खेड, चिपळूण पोफळी, पाटण, कराड, कोल्हापूरमार्गे कणेरी मठ येथे सायंकाळी ५.४५ वा. पोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस रात्री ८.३० वा. कणेरी माठ येथून सुटणार आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आव्हान एसटी प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com