
रत्नागिरी- उत्कर्ष शिक्षक पुरस्कारांचे वितरण
फोटो ओळी
-rat२१p३०.jpg-KOP२३L८४३२०
रत्नागिरी ः एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनतर्फे उत्कर्ष शिक्षक, शाळा पुरस्कारप्राप्त शिक्षक. मागे उभे मोहितकुमार सैनी, संतोष कोलते, रामचंद्र दळवी, सीता दळवी, संचालक डॉ. नयन भेडा आदी.
------------
एस. आर. दळवी फाउंडेशनतर्फे
उत्कर्ष शिक्षक, शाळा पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी, ता. २१ ः येथे सीता रामचंद्र दळवी आणि पती रामचंद्र दळवी यांनी सुरू केलेल्या एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनतर्फे उत्कर्ष शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उमरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, उदयराज कळंबे व संतोष गार्डी या शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार योगेश नाचणकर, मोहन पाटील आणि संध्या भोसले यांना आणि प्रथमेश मोरे व श्रीमती प्रीतम खामकर यांना रायझिंग स्टार असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
साळवी स्टॉप येथील माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला नेहरू युवाकेंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, एमकेसीएलचे समन्वयक संतोष कोलते, संस्थापक रामचंद्र दळवी व सीता दळवी, संचालक डॉ. नयन भेडा उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी अल्पा शहा यांनी अर्थसाक्षरता या विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. नेहरू सायन्स सेंटर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व एस. आर. दळवी फाउंडेशनद्वारे पूर्ण झालेल्या डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्रही उत्कर्ष पुरस्कार सोहळ्यात देण्यात आले. या कोर्ससाठी महाराष्ट्रातील जवळपास १४०० शिक्षकांनी नोंदणी केली होती. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दळवी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज सिद्दीकी, उपाध्यक्ष सुदेश कदम, उपाध्यक्ष संघमित्रा कुरतडकर, सचिव हेमंत पाकळे, सल्लागार रवींद्र इनामदार यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. एस. आर. दळवी फाउंडेशन आता महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी इंग्लिश संभाषण कौशल्य प्रशिक्षण आयोजित करत आहे.
चौकट
शिक्षकांसाठी विविध उपक्रम
शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत. तेच जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे अशा सर्व शिक्षकांसाठी एस. आर. दळवी फाउंडेशन काम करत आहे. ज्ञान ही शक्ती आहे. शिक्षकांशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय जीवन नाही म्हणूनच या फाउंडेशनद्वारे शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे या वेळी संस्थापकांनी सांगितले.