
कणकवली : प्राध्यापक मेळावा
kan212.jpg
84358
कणकवली : येथील संस्कार भारतीच्या स्नेह मेळाव्यात बोलताना निर्माते, दिग्दर्शक दीपक कदम, बाजूला संजय गोडसे, राजेंद्र सावंत आदी.
कलावंतांनी संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवूया
दीपक कदम : कणकवलीत संस्कार भारतीतर्फे कलाकारांचा स्नेहमेळावा
कणकवली, ता. २१: सिंधुदुर्गातील अनेक कलावंत दशावतार, नाटक, तसेच हिंदी मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. या सर्व कलाकारांना संघटित करून त्यांचे प्रश्न मार्गी लावूया, अशी ग्वाही चित्रपट दिग्दर्शक,निर्माते दीपक कदम यांनी दिली.
शहरातील तेलीआळी येथील भवानी सभागृहात सिंधुदुर्गातील कलावंतांचा स्नेहमेळावा झाला. संस्कार भारती कोकण प्रांत यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला. या मेळाव्याला संस्कार भारतीचे कोकण प्रांत सदस्य संजय गोडसे, शैलेश भिडे, जिल्हा महामंत्री आणि चित्रपट दिग्दर्शक, निर्माते दीपक कदम, कार्यकारी निर्माता राजेंद्र सावंत, चित्रपट निर्माते डॉ.तपसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्कार भारतीचे शैलेश भिडे यांनी कलेच्या माध्यमातून होणारे प्रबोधन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संस्कार भारती संघटनेची कार्यप्रणाली आणि उद्देश याबाबत मनोगत मांडले.यावेळी चंद्रशेखर उपरकर, सुप्रिया प्रभूमीराशी, अनिता चव्हाण, अक्षता कांबळी, विवेक वाळके, तन्वी चांदोस्कर, सुदिन तांबे, रोहन पारकर , समीर प्रभूमीराशी आदी जिल्ह्यातील कलाकार आणी कलाप्रेमी उपस्थित होते.