
सहकारी संस्था निवडणूक नामतालिकेसाठी अर्जांचे आवाहन
सहकारी संस्था निवडणूक
नामतालिकेसाठी अर्जांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ः राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ''क'' व ''ड'' वर्गीकरणाच्या सहकारी संस्थांचे निवडणुकीकरिता सहकारी संस्थांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी तयार करावयाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क'' व ''ड'' वर्गातील सहकारी संस्थांचे निवडणूक निर्णय अधिकारी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिकेसाठी विहित नमुन्यात पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, इतर शासकीय विभागातील स्थानिक, स्वराज्य संस्थेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, वकील, सनदी, प्रमाणित लेखापरीक्षक वकील, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवानिवृत्त शिक्षक, खासगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक, सहकारी संस्थेतील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होतो. याचे विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे अर्ज वेब प्रणालीवर उपलब्ध आहेत. याचे अर्ज 28 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अथवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ माणिक सांगळे यांनी केले आहे.