नृत्‍य स्पर्धेत रत्‍नागिरीचा ऋतिक निकम विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृत्‍य स्पर्धेत रत्‍नागिरीचा ऋतिक निकम विजेता
नृत्‍य स्पर्धेत रत्‍नागिरीचा ऋतिक निकम विजेता

नृत्‍य स्पर्धेत रत्‍नागिरीचा ऋतिक निकम विजेता

sakal_logo
By

kan214.jpg
84374
कोंडये : येथील नृत्‍य स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्‍या दीक्षा नाईक हिचा सत्‍कार जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केला.

नृत्‍य स्पर्धेत रत्‍नागिरीचा ऋतिक निकम विजेता
कुडाळची दीक्षा नाईक द्वितीय; कोंडये येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम
कणकवली, ता. २१ : तालुक्‍यातील कोंडये येथे शिवजयंती उत्‍सवानिमित्त आयोजित नृत्‍य स्पर्धेत रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्गातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात रत्‍नागिरीच्या ऋतिक निकम याने प्रथम क्रमांक, कुडाळच्या दीक्षा नाईक हिने द्वितीय क्रमांक तर देवगडच्या रमाकांत जाधव याने तृतीय क्रमांक मिळविला.
निलेश मेस्त्री युवक मंडळांच्यावतीने कोंडये वरचीवाडी येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, पत्रकार गणेश जेठे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर, रणजीत पवार, वनखात्याचे अधिकारी अतुल खोत, माजी सरपंच अनिल मेस्त्री आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुधीर जोशी, अश्‍विनी पेडणेकर, मनवा शेटये यांनी केले. कार्यक्रमात जुदो स्पर्धेमध्ये मोठे यश मिळवलेल्या कस्तुरी तिरोडकर, वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या दुर्गा मुणगेकर हिचा सत्‍कार करण्यात आला.
शिवजयंती उत्‍सवानिमित्त होम मिनिस्टर स्पर्धा झाली. यात प्रथम क्रमांक अनन्या मेस्त्री, द्वितीय क्रमांक भाग्यश्री जेठे आणि तृतीय क्रमांक प्रमिला मोंडकर हिने पटकावला. प्रास्ताविक निलेश मेस्त्री यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाऊजी म्हणून उमेश परब यांनी काम पाहिले.