कोळोशी येथे देवस्वाऱ्यांचा गंगास्नान सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळोशी येथे देवस्वाऱ्यांचा गंगास्नान सोहळा उत्साहात
कोळोशी येथे देवस्वाऱ्यांचा गंगास्नान सोहळा उत्साहात

कोळोशी येथे देवस्वाऱ्यांचा गंगास्नान सोहळा उत्साहात

sakal_logo
By

swt२११९.jpg
८४३८६
कोळोशीः येथील देवस्वाऱ्यांचा शिवगंगा नदीवर गंगास्नान सोहळा पार पडला.

कोळोशी येथे देवस्वाऱ्यांचा
गंगास्नान सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २१ ः कणकवली तालुक्यातील कोळोशी येथील देवस्वाऱ्यांनी ४२ वर्षांनी आपल्या संपूर्ण लवाजम्यासह ढोल-ताशांच्या गजरात जयघोष करत काल (ता. २०) शिवगंगेमध्ये स्नान केले. हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महिला, बाळगोपाळांची उपस्थितीही लक्षणीय होती.
कोळोशी गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, गांगेश्वर पावणाईच्या देवस्वाऱ्या सोमवती अमावास्या आणि महाशिवरात्री हा दुग्धशर्करा योग साधून देवस्वाऱ्या कोळोशी आणि ओझरम या दोन गावांमधून वाहणाऱ्या शिवगंगा नदीवर गंगास्नान करून परतल्या. हा नयनरम्य व भक्तिमय सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी आणि कॅमेराबध्द करण्यासाठी असंख्य कॅमेरे सरसावताना दिसले. हजारो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार झाले. काल सकाळी लवकर खांब काठी सजवून निशान फडकवत संपूर्ण लवाजम्याने दशक्रोशीतील भक्तजनांच्या उपस्थितीत देवाचा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात नदीच्या दिशेने प्रस्थान केले. शिवगंगा नदीच्या पांडवकालीन (चोराचा बांध) बांधाजवळ नदीपात्रात देवस्वाऱ्यांनी शिवगंगेचे पवित्र तीर्थ आपल्या अंगावर घेतले. सोबत भाविकांनीही गंगास्नानाचा आनंद घेतला. या सोहळ्यास गाव व परिसरातील महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. सोहळ्यासाठी मुंबईतील चाकरमानीही काही दिवसांपूर्वीच गावी दाखल झाले होते. दुपारी नदीकाठी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन ग्रामस्थ श्री देव रामेश्वर गांगेश्वर पावणाईचा जयघोष करत घरी परतले.