अणावमधील डंम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलविण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अणावमधील डंम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलविण्याची मागणी
अणावमधील डंम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलविण्याची मागणी

अणावमधील डंम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलविण्याची मागणी

sakal_logo
By

अणावमधील डंम्पिंग ग्राउंड
अन्यत्र हलविण्याची मागणी
सकाळ वृत्तेसवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः अणाव मांजरेकरवाडी, म्हाडा कॉलनी, नवनगर प्राधिकरण कारागृह परिसरातील डंम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ग्रामस्थांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असून हे डम्पिंग ग्राउंड अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली आहे.
जिल्हा मुख्यालय क्षेत्रातील अणाव मांजरेकरवाडीमधील वसाहत, म्हाडा संकुल समोरील प्रस्तावित कचरा डेपोमुळे संपूर्ण भाग प्रदूषित झाला आहे. डम्पिंग ग्राउंड नजीक असलेल्या मांजरेकरवाडी, म्हाडा कॉलनी, नवनगर विकास प्राधिकरण, जिल्हा कारागृह या वस्त्यांना प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मधमाशा, भटके कुत्रे, डास यांचा त्रास येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या वसाहतीतील भूखंड १४६ वर असलेले आरक्षित डंम्पिंग ग्राउंड अन्य ठिकाणी हलविण्यात यावे, अशी मागणी ब्रिगेडीयर सावंत यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.