गाडीला हुल दिल्याच्या रागातून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडीला हुल दिल्याच्या रागातून वाद
गाडीला हुल दिल्याच्या रागातून वाद

गाडीला हुल दिल्याच्या रागातून वाद

sakal_logo
By

गाडीला हुल दिल्याच्या
रागातून वाद; तिघांवर गुन्हे
सावंतवाडीतील प्रकारः माजी नगरसेवकाचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः येथे भरबाजारपेठेत पिस्तूल दाखवल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह दोघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. येथील आठवडा बाजारनजीक पेट्रोल पंपासमोर माजी नगरसेवक व त्याचा एक साथीदार असलेला युवक जात असताना गाडीला हुलकावणी दिल्याच्या रागातून वाद उद्भवला. या वादात काजरेकर याने हातातील टेस्टरने नगरसेवकाचा साथीदार असलेल्या युवकावर वार केला. यात तो किरकोळ जखमी झाला. त्यानंतर आपल्यावर वार होण्याच्या भीतीने आत्मसंरक्षणासाठी नगरसेवकाने स्वतःजवळील रिव्हॉल्व्हर बाहेर काढून धाक दाखवला, अशी माहिती पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी दिली. या वादानंतर बाजारपेठेत एकच गर्दी झाली होती. दोन्ही गट पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सायंकाळी उशिरा दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवून घेत नगरसेवक व त्याचा साथीदार यासह हल्ला करणाऱ्या युवकावर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.
याबाबत नेल्सन फेराव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, येथील नासीर शेख यांच्याकडे गेले पंधरा वर्षांपासून त्यांच्या बांधकाम साईटवर मॅनेजर म्हणून काम करीत आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मी आणि नासीर शेख असे आमचे प्रांत ऑफिसमधील काम झाल्यानंतर शेख यांच्या दुचाकीवरून गवळी तिठा येथे जात होतो. यावेळी बस स्टँडच्या समोरील कुडाळ ते सावंतवाडी रस्त्यावर बाहेरचावाडा-सावंतवाडी येथे राहणाऱ्या शैबाज सैफुद्दीन काजरेकर हा गवळी तिठ्यावरून बाजाराच्या दिशेने येत होता. त्याने आम्हाला पाहून आमच्या गाडीस हुलकावणी देत शिवी दिली. म्हणून त्याला मी व शेख यांनी शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. यावेळी त्याने आम्हाला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील लोखंडी लहान पिवळ्या रंगाच्या टेस्टरने माझ्या पोटाच्या बाजूला मारून जखमी केले. यात माझे शर्टही फाटले. माझ्यासोबत असणारे शेख यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानुसार तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित काजरेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शैबाज शैफुद्दीन काजरेकर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास काजरेकर मोहल्ला येथे मी नगरपालिकेचे रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना पाणी देऊन घरी जात होतो. यावेळी नासीर अहमद ईस्माईल शेख (रा. गरड माजगाव) यांनी तुझा पालिकेच्या रस्ताकाम करणाऱ्या कामगारांना पाणी देण्याचा काय संबंध, असे विचारून तुला बघून घेतो, अशी धमकी दिली व तेथून निघून गेला. त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मी व माझ्या मामाचा मुलगा माझ्या दुचाकीवरून भांगले पेट्रोल पंपाजवळ वडिलांना डबा घेऊन उपजिल्हा रुग्णालय येथे जात असताना नासीर शेख व त्याचा मित्र नेल्सन संतान फेराव (रा. न्यू सालईवाडा सावंतवाडी) हे दोघे शेख यांच्या गाडीवरून माझ्या समोर येऊन थांबले. त्यांनी माझ्याशी धकाबुक्की करून माझा टी-शर्ट फाडून मला शिवीगाळ केली. म्हणून मी माझ्याकडील टेस्टरने त्याला देखील मारहाण केली. यावेळी नासीर शेख याने त्याच्याकडील पिस्तुल बाहेर काढून तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.