कुडाळातील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळातील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती
कुडाळातील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

कुडाळातील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

sakal_logo
By

84542
कुडाळ ः नृत्य स्पर्धेत खुल्या गटात विजेत्या मृणाल सावंतचा सन्मान करताना सभापती श्रेया गवंडे.


कुडाळातील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

शिवजयंतीदिनी कार्यक्रम; साई कला, क्रीडा मित्रमंडळाचा पुढाकार

कुडाळ, ता. २२ ः कुडाळ-नाबरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत, तर लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या ठरल्या. शहरातील नाबरवाडी येथील साई कला, क्रीडा मित्रमंडळ व बांधकाम सभापती नगरसेविका श्रेया गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (ता. १९) उत्साहात साजरी झाली.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन सकाळी सातला निघालेल्या शिवभक्तांचे अकराला नाबरवाडी येथे आगमन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. दुपारी लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी खेळ घेण्यात आले. सायंकाळी रेकॉर्ड डान्स स्पर्धा झाली. कार्यक्रमाची सुरुवात संचिता फडके यांचे समई नृत्य, मानसी वाळकेचा पोवाडा, साईल सातार्डेकर याच्या ‘राजं आलं’ आणि इशिता गवंडेच्या ‘माय भवानी’ नृत्याने झाली. एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण तुशांत सोनावणे (मुंबई), सागर सारंग (देवबाग) यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन नागेश नाईक यांनी केले. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत, नेहा जाधव, संजना पवार, लहान गटात दीक्षा नाईक, आरव आईर, अंतरा ठाकूर यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावस्कर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेविका श्रुती वर्दम यांनी कार्यक्रमाला भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष राजू गवंडे, सूरज गवंडे, साईश नाबर, धनंजय परब, रोहित राऊळ, जयेश कावले, प्रथमेश राऊळ, शार्दूल कांबळी, तन्मय कुनकावळेकर, केतन वरवडेकर, मंगेश वरवडेकर, राजाराम तोरस्कर, राजू खानोलकर, हेमंत गवंडे, सिद्धेश राऊळ, समीर गवंडे, सचिन खोत, सचिन महाडिक, गोट्या पंडित, गुरू गडकर, ओंकार राऊळ, मिहिर खानोलकर, शिवम गावडे, मंथन कुमटेकर, वेदांत कुपेरकर, प्रथमेश नाईक, प्रणाली गवंडे यांनी कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला प्रेमदास राठोड, उदय बाणे, सुबोध राऊळ, न्हानू गावडे, सचिन खोत, संजय परब, जयसिंग बांदेकर, श्रीराम काजरेकर, हेमंत शिरसाट, अमित शिरसाट आदींचे सहकार्य लाभले.