डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती
डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

sakal_logo
By

डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती
कणकवली : तालुक्‍याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांना कट्टा पेंडूर (ता.मालवण) येथील ग्रामीण रूग्‍णालयात नियुक्‍ती दिली आहे. यापूर्वी डॉ.पोळ यांची पालघर जिल्ह्यातील वाडा येथील रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्‍हणून पदोन्नती दिली होती; मात्र डॉ.पोळ यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. डॉ. पोळ यांच्याकडे कळसुली प्राथमिक आरोग्‍य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्‍हणून कार्यरत आहेत. तर तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचीही जबाबदारी त्‍यांच्याकडे दिली आहे. कोरोना काळात त्‍यांनी तालुक्‍याची आरोग्‍यसेवा सक्षमपणे सांभाळली होती. गतवर्षी त्‍यांची वाडा (पालघर) येथील रूग्‍णालयात पदोन्नतीने वैद्यकीय अधीक्षक म्‍हणून झाली होती; मात्र त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणाहून कार्यमुक्त केलं नव्हतं. आता कट्टा पेंडूर येथील ग्रामीण रूग्‍णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर त्यांना नियुक्‍ती दिली आहे.