‘त्या’ अधिकाऱ्याकडून ठाकर समाजावर अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ अधिकाऱ्याकडून 
ठाकर समाजावर अन्याय
‘त्या’ अधिकाऱ्याकडून ठाकर समाजावर अन्याय

‘त्या’ अधिकाऱ्याकडून ठाकर समाजावर अन्याय

sakal_logo
By

84571
मुंबई : येथील अदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याशी आमदार नीतेश राणे यांनी चर्चा केली.

ठाकर समाजावर अन्याय
करणाऱ्याची बदली करा

आमदार राणे; मंत्री गावितांकडे अधिकाऱ्याची तक्रार

कणकवली, ता.२२ : जात पडताळणी विभागातील एक अधिकारी सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील बांधवांची सतत अडवणूक करत आहे. त्‍यामुळे ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी ‘त्या’ अधिकाऱ्याला हटवा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली. तर संबधित अधिकाऱ्याची बदली करण्याची ग्‍वाही श्री.गावित यांनी दिल्‍याची माहिती श्री.राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधव जात पडताळणीचे प्रस्ताव ठाणे येथील जात पडताळणी कार्यालयात सादर करतात. मात्र तेथील अधिकारी हे सिंधुदुर्गातून आलेले प्रस्ताव फेटाळून लावतात. याविरोधात कुणी न्यायालयात दाद मागितली तर जात पडताळणी प्रस्ताव मंजूर केले जातात. त्‍यामुळे जाणीवपूर्वक सिंधुदुर्गातील ठाकर समाज बांधवांवर ते अन्याय करत असल्‍याची भावना आमदार श्री.राणे यांनी श्री.गावित यांच्याकडे केली. दरम्यान, आदिवासी विभागाच्या आयुक्‍तांना याबाबतच्या सूचना तातडीने दिल्या आहेत. तर दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीबाबत कार्यवाही केली जाईल, अशी ग्‍वाही मंत्री श्री.गावित यांनी दिल्याची माहिती श्री.राणे यांनी दिली.