राजापूर ःअग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी प्रथमेश सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःअग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी प्रथमेश सज्ज
राजापूर ःअग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी प्रथमेश सज्ज

राजापूर ःअग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी प्रथमेश सज्ज

sakal_logo
By

(काही सुखद ..............लोगो)

rat२२p१३.jpg
८४५२३
प्रथमेश गुगद्धडी

rat२२p१४.jpg ः
८४५२४
कुटुंबीयांसमवेत प्रथमेश गुगद्धडी.

अग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी प्रथमेश सज्ज
राजापुरचा सुपुत्र ; ३ वर्षाच्या मेहनतीचे फळ

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ः तालुक्यातील चिरेखाणीवर तीस वर्षे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विठ्ठल कल्लापा गुगद्धडी यांचा मुलगा प्रथमेश याची अग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या निवड चाचणीत अग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी सुमारे ९० हजार युवकांमधून ५३६ जणांची निवड झाली असून, त्यामध्ये प्रथमेशचा समावेश आहे. नाटे येथे सध्या वास्तव्यास असलेल्या प्रथमेशने या निवडीसाठी तिन वर्ष घेतलेली मेहनत फळाला आली.
प्रथमेशचे कुटुंबीय ३० वर्षापासून तालुक्यामध्ये वास्तव्यास आहे. ते चिरेखाणींसह अन्य ठिकाणी मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. प्रथमेशचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तालुक्यातील विविध ठिकाणी झाले आहे. पोलिस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी तो कोरोना काळापासून मेहनत घेत आहे. त्यासाठी नियमित मैदानी सराव करताना पाठ्यपुस्तकीय अभ्यास करत आहेत. त्याचवेळी भारत सरकारने जाहीर केलेल्या अग्निवीर सैनिक म्हणून संधी मिळावी म्हणून त्याने लक्ष केंद्रीत केले होते. त्या दृष्टीने आवश्यक ते सराव आणि अभ्यास करण्यावर त्याने भर दिला. त्यासाठी तो गेले ३ वर्ष कसून सराव करण्यास मेहनत घेत होता. त्यासाठी त्याला नाटे येथील सागरी पोलिस ठाणे येथील गोपनीयचे काम करणारे पोलिस दीपक काळे यांचेही महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभत होते. त्याच्या या मेहनतीचे फळ मिळताना त्याची कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणीमध्ये अग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
भारत सरकारने जाहीर केलेल्या अग्निवीर सैनिक म्हणून काम करता यावं यासाठी मेहनत घेत होतो आणि त्यानंतर निवड प्रक्रियेत सहभागी झालो. निवड प्रक्रियेतील सर्व टप्पे पार करत आपली निवड झाली आहे. त्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी मिळणार असल्याने त्याबद्दल आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रथमेशने व्यक्त केली आहे. आपल्या यशात काबाडकष्ट करणारे आई-वडील आणि कुटुंबीयांचे योगदान महत्वाचे असून नाटे सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस काळे, जैतापूर ,नाटे, आडिवरे परिसरातील लोकांनी केलेले मार्गदशन महत्वाचे ठरल्याचे सांगत त्याबद्दल त्याने कृतज्ञताही व्यक्त केली आहे. मूळ कर्नाटक राज्यातील असलेल्या प्रथमेशने अनेक अडचणींवर मात करत त्याने मिळवलेले यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे.