सोनुर्ली परिसरात हरियाणा मुरा म्हैशी आणणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनुर्ली परिसरात हरियाणा मुरा म्हैशी आणणार
सोनुर्ली परिसरात हरियाणा मुरा म्हैशी आणणार

सोनुर्ली परिसरात हरियाणा मुरा म्हैशी आणणार

sakal_logo
By

84606
सोनुर्ली ः येथे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणावेळी उपस्थित प्रमोद गावडे, सौ. प्रियांका गावडे, सागर किल्लेदार, नारायण हिराप आदी.

सोनुर्ली परिसरात हरियाणा मुरा म्हैशी आणणार

प्रमोद गावडे; दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्यांना देणार प्रशिक्षण

सावंतवाडी, ता. २२ ः सोनुर्ली, निरवडे व न्हावेली येथील दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आर्थिक सहाय्यातून लवकरच हरियाणा मुरा जातीच्या दुधाळ ३० म्हैशी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी दिली.
सोनुर्ली येथील माऊली बादेकर दुग्ध संस्था आणि गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धव्यवसाय शेतकरी प्रशिक्षण सोनुर्ली येथे घेण्यात आले. यावेळी सोनुर्ली, न्हावेली व निरवडे भागातील ५० शेतकरी उपस्थित होते. यावेळी श्री. गावडे बोलत होते.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्यावतीने सागर किल्लेदार व भगवान गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या आर्थिक सहाय्याने लवकरच हरियाणामध्ये जाऊन हरियाणा मुरा जातीच्या म्हैशी आणण्यासाठी शेतकरी जातील, असे यावेळी त्यांनी सांगितले. माजी सभापती सौ. प्रियंका गावडे, खरेदी विक्री संघाचे संचालक नारायण हिराप, सोनुर्ली येथील नव संजीवनी दुग्ध संस्थेचे सुनील गाड, रवींद्र धाऊसकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, इब्राहम करोल, राकेश पांढरे, नंदकिशोर गावकर, दीपलक्ष्मी गावकर, नीलेश मोर्ये, मकरंद पेडणेकर, सुनील गावडे, अविनाश गाड, महादेव गावकर आणि शेतकरी उपस्थित होते. माजी सभापती गावडे, हिराप आदींनी शंकांचे निरसन केले.
--
आर्थिक स्तर सुधारा
गावडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी गतवैभव प्राप्त करण्यासाठी शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे. त्यातून आर्थिक प्रगती साध्य होईल. योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर हा व्यवसाय झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, अण्णासाहेब पाटील महामंडळ कायम तत्पर असेल. शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. मार्गदर्शनासाठी नेहमीच प्रयत्न करत राहू.’’