राजे प्रतिष्ठान विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजे प्रतिष्ठान विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
राजे प्रतिष्ठान विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

राजे प्रतिष्ठान विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

rat२२१६.txt

बातमी क्र. .१६ ( पान २ साठी)

- rat२२p१२.jpg ः
८४५२२
मंडणगड ः राजे प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करताना हिरकणी मंचाच्या सदस्या.

मंडणगडात शोभायात्रा, कबड्डी स्पर्धा

राजे प्रतिष्ठानचे आयोजन ः गरजू महिलांना शिलाई मशिन

मंडणगड, ता. २२ ः शिवजयंतीचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठानतर्फे शहरात फेरी व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या पुर्व संध्येला राजेप्रतिष्ठानचे मावळे रायगडकडे रवाना झाले. तेथून मंडणगड येथे शिवज्योत आणण्यात आली. या शिवज्योतीची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शहरातील बालतरुण, महिला, पारंपरिक वेषात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिव पालखीची मिरवणूक मंडणगड बसस्थानक ते तहसील कार्यालय अशी काढण्यात आली. या यात्रेमुळे शहरातील वातावरण शिवमय होऊन गेले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेनिमित्त स्वागत समारंभ, सांस्कृतिक, नृत्य कार्यक्रम व महाराजांच्या जीवनावर पोवाड्याचे गायन करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या राजे प्रतिष्ठानच्यावतीने यंदा महिलांसाठी हिरकणी मंचाची स्थापना करण्यात आली. या निमित्ताने महिलांना वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. गरजू महिलांना या कार्यक्रमात राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने शिलाई मशिनचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमास उपस्थित मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद सेव्हन स्टार मुंबई संघाने मिळवले तर द्वितीय क्रमांक नवतरुण क्रीडामंडळ आसनपोई महाड यांनी मिळवला. तृतीय क्रमांक अवधूत फायटर्स दापोली या संघाने मिळवला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश वसंत जाधव, नितीन सोनघरे, सतीश बेर्डे, प्रज्योत गांधी, संजय राठोड, ज्ञानदेव निकम, अक्षय भगत आदींनी मेहनत घेतली. रायगडहून शिवज्योत आणण्याच्या मोहिमेत शैलेश शिगवण, नितेश मळेकर, योगेश जंगम, सुधीर मनवे, प्रज्वल चव्हाण, अभिषेक कदम यांनी मेहनत घेतली. राजे प्रतिष्ठान मंडणगड यांनी सुरू केलेल्या हिरकणी मंचाच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षा संपदा भगत, माधवी करमरकर, सुरेखा जगताप, प्रमिला किंजळे, वैदेही जाधव, शुभ्रा कदम, नम्रता सातोपे यांची उपस्थिती व सहभाग लाभला.