चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्नचिन्ह
चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्नचिन्ह

चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्नचिन्ह

sakal_logo
By

Rat22p8.jpg
L84529
चिंचाळीः म्हाप्रळ रोहिदासवाडी पन्हळी दरम्यानच्या रस्ता कामावर पाण्याचा वापर न झाल्याने दुरवस्था.

महामार्गाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप
आंबडवे लोणंद; काँक्रिट रस्त्यावर पाण्याच्या वापराकडे दुर्लक्ष
मंडणगड, ता. २२ः दीर्घकाळ रखडलेल्या आंबडवे-लोणद राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीच्या कामास यंदाच्या बांधकाम हंगामास सुरवात झाली; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सध्या कार्यवाही सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाकडे पूर्णपणे लक्ष न दिल्याने पाण्याअभावी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार पुढे येत आहे.
यंदाचे हंगाम राष्ट्रीय महामार्गाचे मंडणगड ते म्हाप्रळ हा या अंतरातील रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन यंत्रणांनी केले आहे; मात्र म्हाप्रळ ते चिंचाळी धरण या सुमारे चार किलोमीटरच्या अंतरातील रस्ता हा गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांचे कारण ठरले आहे. पावसाच्या दिवसात वरच्यावर मलमपट्टी केलेला हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त होतो व मूळ जुना रस्ता महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराने केव्हाच खोदून टाकला आहे. सध्या काँक्रिटीकरण सुरू असलेल्या रस्त्यावर क्कॉरिंगकरिता गेल्या अनेक दिवसात पाणीच मारले नसल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गतवर्षी याच काँक्रिटकृत रस्त्याचे काम सुरू असताना सावित्री नदीतील खाऱ्या पाण्याचा वापर केला होता. नागरिकांनी तक्रार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या तक्रारींकडे लक्षच दिलेले नव्हते. त्यामुळे यंदा हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यांची नव्याने डागडुजी करण्याची आवश्यकता निर्माण झालेली असताना पूर्ण अंतरातील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय कारवाई प्राधिकऱण करताना दिसून येत नाही. काम सुरू असताना प्राधिकरणाचे अभियंते साईटवर उपस्थित राहात नाहीत. यंदा तर पाण्याचा कमीत कमी किंवा शक्य तितका वापर टाळल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
या वेळी महामार्ग प्राधिकरण कधी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. विविध कारणांनी राष्ट्रीय महामार्गास निधी मंजूर असूनही आधीच्या समस्यांमध्ये नव्या अडचणीही भर पडलेली आहे. विना पाणीवापरचा हा रस्ता या पावसापूर्वी परत कामाला येऊ नये अशी अपेक्षा करण्याचा एकमेव मार्ग नागरिकांच्या हातात राहिला व यास महामार्ग प्राधिकरण कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.याबाबत अभियंता अभिजित झेंडे यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही.

कोट
जे काँक्रीटीकरण केले आहे त्यावर आवश्यक असणारे पाणीच मारले जात नाही. त्यामुळे आधीच लाल धुळीने त्रस्त असणारे वाहनचालक आता सिमेंटच्या उडणाऱ्या धुळीने वैतागले आहेत. मागून जाणाऱ्या वाहनांना समोरचा रस्ता दिसत नसून अपघाताची शक्यता बळावली आहे.
- शब्बीर मांडलेकर, म्हाप्रळ