ई-पीक नोंदणी कालावधी निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक नोंदणी कालावधी निश्चित
ई-पीक नोंदणी कालावधी निश्चित

ई-पीक नोंदणी कालावधी निश्चित

sakal_logo
By

ई-पीक नोंदणी कालावधी निश्चित
सिंधुदुर्गनगरी : मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी व तलाठी स्तरावरील कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे, अशी माहिती प्र.डी.डी.ई. तथा निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी हंगाम खरीप १५ जून ते १५ ऑक्टोबर, रब्बीसाठी १६ ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारी आणि उन्हाळीसाठी १६ फेब्रुवारी ते ३० एप्रिल राहील. तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी हंगाम खरीप १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, रब्बीसाठी १६ फेब्रुवारी ते १५ मार्च आणि उन्हाळीसाठी १ ते ३१ मे राहील. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख ई-पीक पाहणी अंमलबजावणी कक्ष पुणे यांच्याकडील १५ फेब्रुवारीअन्वये राज्यात मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येत आहे.
................
पुरस्कारांबाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांच्या प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी यासाठी अधिकाधिक प्रवेशिका दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.