
देवगडात आजपासून कायदेविषयक शिबीरे
देवगडात आजपासून
कायदेविषयक शिबिरे
देवगड, ता. २२ ः येथील तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इळये आणि शिरगाव या गावांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्या (ता. २३) इळये ग्रामपंचायतीत, तर शुक्रवारी (ता. २४) शिरगाव ग्रामपंचायतीत शिबिर होईल. शनिवारी (ता. २५) जामसंडे येथील श्री. मो. गोगटे हायस्कूलमध्ये मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
इळये ग्रामपंचायतीत उद्या सकाळी दहाला आयोजित शिबिरात निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, अॅड. गिरीश भिडे, अॅड. सिद्धेश माणगावकर, अॅड. आरती दामले मार्गदर्शन करणार आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीत शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहाला आयोजित शिबिरात निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, अॅड. संगीता कालेकर, अॅड. समृद्धी साटम, अॅड. मिल्केशा सांगळे, अॅड. मैथिली खोबरेकर मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता. २५) सकाळी दहाला जामसंडे येथे आयोजित मोबाईल व्हॅन लोकअदालतीत पॅनेलप्रमुख म्हणून निवृत्त न्यायाधीश श्री. उपाध्ये व पॅनेल सदस्य म्हणून अॅड. इंद्रनील ठाकूर, अॅड. वीणा लिमये, अॅड. अन्वी कुळकर्णी हे काम पाहणार आहेत. या मोबाईल व्हॅन लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके यांनी केले आहे.