ओबीसींनी न्यायहक्कासाठी लढले पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसींनी न्यायहक्कासाठी लढले पाहिजे
ओबीसींनी न्यायहक्कासाठी लढले पाहिजे

ओबीसींनी न्यायहक्कासाठी लढले पाहिजे

sakal_logo
By

rat२२४६.TXT

बातमी क्र.. ४६ (पान ५ साठी)

ओबीसींनी न्यायहक्कासाठी लढले पाहिजे ; मोहिते

रत्नागिरी, ता. २३ ः अठरापगड ओबीसी समाजबांधवांनी आपल्या न्यायहक्कासाठी लढले पाहिजे असे प्रतिपादन नंदकुमार मोहिते यांनी केले. ओबीसी संघर्ष समन्वय समिती, बामसेफ आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफचे कमलाकांत काळे यांनीही विचार व्यक्त केले. महापुरुषांचे विचार जोपासताना संघर्ष करावा लागतो. विचारांचा वारसा आणि वसा जोपासला तरच समाजात क्रांती होईल. त्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. जगणं हा केवळ विचार नाही तर विचारांच मंथन समाजात निरंतर पेरलं तरच निद्रिस्त ओबीसी समाज जागा होईल, असे काळे यांनी सांगितले. या वेळी प्रकाश साळवी, रघुवीर शेलार, दीपक राऊत, मिलिंद नार्वेकर, साक्षी रावणांग, एल. व्ही. पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.