
शिवजयंतीदिनी वेंगुर्लेत रंगला ‘सकल मराठा’चा मेळावा
84672
वेंगुर्ले : छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्रज्ञा परब. शेजारी सिद्धेश परब, रवी परब, उमेश येरम आदी.
शिवजयंतीदिनी वेंगुर्लेत रंगला
‘सकल मराठा’चा मेळावा
वेंगुर्ले ः सकल मराठा समाज तालुका वेंगुर्ले यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. पॉवर हाऊसपासून सुरुवात झालेल्या या रॅलीमध्ये सुमारे ३०० दुचाकींस्वार सहभागी झाले. ही रॅली रामेश्वर मंदिर पिराचा दर्गा, जुने बसस्थानक, दाभोली नाका, बाजारपेठ, हॉस्पिटल नाका ते सातेरी मंदिर, अशी काढण्यात आली.
त्यानंतर सातेरी मंदिर या ठिकाणी मराठा समाजाचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या मराठा समाजाचे सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. काही समाजसेवकांचाही सत्कार झाला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सिद्धेश उर्फ भाई परब, सचिव राजबा सावंत, महिला संघटनेच्या अध्यक्ष प्रज्ञा परब, सातेरी मंदिरचे व्यवस्थापक रवी परब, प्रसिद्ध उद्योजक माजी नगरसेवक उमेश येरम आदी उपस्थित होते.