शिरोडा पंचक्रोशीत ''बीएसएनएल''चा बट्ट्याबोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोडा पंचक्रोशीत ''बीएसएनएल''चा बट्ट्याबोळ
शिरोडा पंचक्रोशीत ''बीएसएनएल''चा बट्ट्याबोळ

शिरोडा पंचक्रोशीत ''बीएसएनएल''चा बट्ट्याबोळ

sakal_logo
By

swt2317.jpg
84777
सावंतवाडीः बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांना जाब विचारताना धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक व राजाराम चिपकर आदी.


शिरोड्यात ‘बीएसएनएल’चा बट्ट्याबोळ
मनसे आक्रमकः जिल्हा प्रबंधक जन्नू धारेवर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः धाकोरे, आजगाव, शिरोडा, वेळागर पंचक्रोशीसह बऱ्याच भागात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ झाल्याने धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्यासह मनसेचे माजी तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांना घेराओ घातला. यावेळी मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले.
धाकोरे येथे मंजूर झालेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर का रद्द करण्यात आला? असा सवाल धाकोरे सरपंच मुळीक यांनी करीत शिरोडा वेळागर परिसरात बीएसएनएलचा पूर्णतः बोजवारा उडाला असून फोन लावण्यासाठी ग्राहकांना शिरोडा बाजारपेठेत यावे लागते, असे सांगितले. आपली सेवा कधी सुधारणार, असा संतप्त सवाल चिपकर यांनी केला. अनियमित मोबाईल सेवेमुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न मनसेचे माजी शाखाध्यक्ष निलेश मुळीक यांनी केला. विविध प्रश्नांची सरबत्ती जन्नू यांच्यावर करण्यात आली. काही ठिकाणी वीज प्रवाह खंडीत झाल्यास डिझेल अभावी नेटवर्कचा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. काही ठिकाणी सोमवारी लाईट नसल्यामुळे नेटवर्कसाठी पूर्ण दिवस वाट बघावी लागते व त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होतो. पंचक्रोशीतील ज्या-ज्या ठिकाणी नेटवर्कसंबंधी ज्या काही समस्या आहेत, त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्नू यांच्यासमोर मांडल्या. काही ठिकाणी उद्घाटन झालेले टॉवरही निरुपयोगी असल्याचे निदर्शनास आणून दिले. विस्कळीत सेवा लवकरच न सुधारल्यास ग्रामस्थांसह आक्रमक पवित्र घेत कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दूरध्वनीवरून जिल्हा प्रबंधक यांच्याशी चर्चा करत उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची नेटवर्क संबंधित समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली. सरपंच मुळीक, मनविसे उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, माजी तालुका सचिव चिपकर, माजी शाखा अध्यक्ष मुळीक उपस्थित होते.

कोट
आरोस, धाकोरे, तिरोडा, वेळागर पंचक्रोशीतील इतर बीऐसएनएलचीं मोबाईल सेवा लवकरच सुरळीत केली जाणार आहे.
- रविकिरण जन्नू, जिल्हा प्रबंधक, बीएसएनएल