क्षयरोग लाभार्थ्यांना बांद्यात धान्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोग लाभार्थ्यांना बांद्यात धान्य वाटप
क्षयरोग लाभार्थ्यांना बांद्यात धान्य वाटप

क्षयरोग लाभार्थ्यांना बांद्यात धान्य वाटप

sakal_logo
By

swt2324.jpg
84791
बांदाः लाभ्यार्थ्यांना धान्याचे वाटप करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

क्षयरोग लाभार्थ्यांना
बांद्यात धान्य वाटप
बांदा, ता. २३ः रोटरी क्लबच्या ११८ व्या वर्धापनदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदा यांच्यातर्फे क्षयरोग ‘निक्षयमित्र’ या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव मिताली सावंत, रोटरी क्लब बांदाचे सदस्य आबा धारगळकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, सुदन केसरकर, हनुमंत शिरोडकर, डॉ. भालचंद्र कोकाटे, सीताराम गावडे, संदीप देसाई, शीतल राऊळ, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते. कल्याणकर यांनी सर्व क्षयरोग लाभार्थ्यांना नोव्हेंबरपासून प्रत्येक महिन्याचे धान्य पुरवले जाते व यापुढेही प्रत्येक महिन्यात पुरवले जाईल, असे प्रतिपादन केले. रोटरॅक्ट क्लब रोटरी क्लबच्या खांद्याला खांदा लावून लोकसेवेत काम करेल, असे मत रोटरॅक्ट अध्यक्ष मयेकर यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन सुधीर शिरसाट यांनी केले.
.................
swt2325.jpg
84815
हुमरमळाः ‘भजनसुधा’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अतुल बंगे व मान्यवर.

‘भजनसुधा’ कार्यक्रमास प्रतिसाद
कुडाळः हुमरमळा-वालावल येथील श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून ‘भजनसुधा’ हा बाल कलाकारांचा कार्यक्रम वैभव मांजरेकर मित्रमंडळाच्या वतीने पार पडला. या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड दाद देत या बालकरांवर बक्षिसांची खैरात केली. राम कृष्ण हरी भजन संस्कार वर्गातून संगीत गायनाचे धडे घेतलेले हे विद्यार्थी योगेश प्रभू यांच्याकडे संगीत विषयक मार्गदर्शन घेत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, श्री देव रामेश्वर उपसमिती देवस्थान अध्यक्ष अमृत देसाई यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी शेखर परब, आशिष देसाई, मयूर प्रभू, मंदार वालावलकर, शरद वालावलकर, प्रकाश परब, प्रकाश आजगावकर उपस्थित होते.
..................