
''गर्जा महाराष्ट्र'' गीताचे बांद्यात सादरीकरण
swt2332.jpg
84858
बांदाः राज्यगीत सादर करताना बांदा केंद्रशाळेचे विद्यार्थी.
‘गर्जा महाराष्ट्र’ गीताचे
बांद्यात सादरीकरण
बांदा, ता. २३ः महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरुणाई व सर्वच नागरिकांना स्फूर्तिदायक असणारे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यगीत म्हणून स्वीकारले आहे. या गीताचा बांदा केंद्रशाळेत अंगीकार करण्यात आला.
येथील केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व पारंपरिक वेशभूषा करून हे गीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शाळेत सामूहिकरित्या गायन केले. या दिवशी विविध मंडळांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून या गीताचे गायन करून जनजागृती केली.
या उपक्रमात मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, बांदा सरपंच प्रियंका नाईक, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळाचे सदस्य, प्रा. रुपेश पाटील, बांदा शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील, शीतल गवस, प्रशांत पवार, गोपाळ साबळे आदी सहभागी झाले होते.
..............
swt2331.jpg
84857
बांदाः येथे स्वच्छता मोहीम राबविताना रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथचे पदाधिकारी. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)
बांदेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता
बांदाः रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ, बांदातर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिर परिसराची आज स्वच्छता करण्यात आली. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, दत्तराज चिंदरकर, निहाल गवंडे, अक्षय कोकाटे, साईस्वरूप देसाई, मुईन खान आदी उपस्थित होते. रोटरॅक्टच्या माध्यमातून वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मयेकर यांनी दिली.