भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू
भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू

भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू

sakal_logo
By

rat२३२४txt

बातमी क्र..२४ ( पान ३ साठी)

rat२३p२०.jpg ः
८४८०७
गुहागर ः मंत्री उदय सामंत यांना पुष्पगुच्छ देताना गुहागर नगरपंचायतीमधील नगरसेविका.


आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे

नगरसेविका गोयथळे ;भाजपमध्ये आहोत, भविष्यातही राहू

गुहागर, ता. २३ ः आम्ही भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू. उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी आमच्या प्रभागांमध्ये निधी दिला म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही सामंत यांची भेट घेतली. तालुकाध्यक्षांना सांगून मंत्री महोदयांची भेट घेतल्यानंतरही त्याबाबत वेगळी चर्चा होत असेल, आमच्या प्रामाणिकपणावर, निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात असेल तर ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका मृणाल गोयथळे व भाग्यलक्ष्मी कानडे यांनी दिली.
२० फेब्रुवारीला गुहागर नगरपंचायतीमधील शहरविकास आघाडीच्या चार व भाजपच्या दोन अशा एकूण ६ नगरसेविकांनी रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू भैया सामंत यांची भेट घेतली होती. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे (शिंदे गट) गुहागर तालुकाप्रमुख दीपक कानगुटकर उपस्थित होते. त्यामुळे या भेटीची चर्चा गुहागरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. भाजपच्या दोन्ही नगरसेविकांनी उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांना दिली होती. त्यानंतरही सुरू झालेल्या चर्चांना विराम मिळावा म्हणून खुलासा करतो असे सांगत भाजपच्या नगरसेविका गोयथळे म्हणाल्या, माझ्या प्रभागातील एका पाखाडीसाठी निधी हवा होता. हा निधी उदय सामंत यांनी मंजूर करून दिला तसेच त्यांनी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात माझ्या प्रभागातील काही तरुणांनी अर्ज केले होते. त्याचा पाठपुरावा करायचा होता. या दोन्ही कामांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भेट घेणे मला आवश्यक वाटले. भाजपच्या नगरसेविका कानडे म्हणाल्या, आमच्या प्रभागातील नारायण मंदिर ते समुद्र पाखाडीच्या नूतनीकरणासाठी सुमारे १ कोटीचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे. या कामाचा प्रस्ताव आता तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी सदिच्छा भेट घेण्याचे आम्ही ठरवले होते. आम्ही दोघी गेली अनेक वर्षे कोणतेही पद नसताना भाजपचे प्रामाणिकपणे काम करत आहोत. भाजपने आम्हाला नगरसेविका होण्याची संधी दिली. त्यानंतरही नगरसेविका म्हणून ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांची कामे करत आहोत. प्रभागाच्या विकासासाठी झटत आहोत. पक्ष संघटना वाढावी म्हणून निःस्वार्थपणे काम करत आहोत.

--